विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते लखनऊ येथे सीएसआयआर-एनबीआरआय द्वारे विकसित देशातील पहिलेच 'इको-एज्युकेशनल हब' राष्ट्राला समर्पित

प्रविष्टि तिथि: 08 AUG 2026 6:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2026

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज वैज्ञानिक संस्थांचे कार्य समाजाच्या अधिक जवळ नेण्याचे आवाहन केले. यासाठी संस्थांनी आपली तंत्रज्ञाने, यशोगाथा आणि सामाजिक अनुप्रयोग पद्धतशीरपणे लोकांसमोर मांडले पाहिजेत, असे ते म्हणाले. लखनऊ येथील बंथरा येथील महर्षि पराशर बायोरिफाइनरी सेंटर (MPBC) मध्ये सीएसआयआर-नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-NBRI) च्या पहिल्यावहिल्या 'इको-एज्युकेशनल हब' म्हणजेच ‘प्रकृती ज्ञान धाम’चे उद्घाटन करताना ते बोलत होते.

वैज्ञानिक संस्थांचा विस्तार केवळ प्रयोगशाळा आणि संस्थात्मक आवारांपुरता मर्यादित न राहता डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून अधिक व्यापक झाला पाहिजे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी नमूद केले.

यशस्वी तंत्रज्ञान आणि उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवल्याने शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, उद्योग आणि इतर भागधारकांना वैज्ञानिक उपाय तसेच उपजीविकेच्या संधी उपलब्ध होऊ शकतील, असे ते म्हणाले.

त्यांनी विविध विभाग आणि मंत्रालयांमधील समान व एकमेकांना पूरक असणाऱ्या प्रकल्पांमध्ये अधिक समन्वयाचे आवाहन केले, ज्यामुळे संस्थांना एकत्र काम करून वैज्ञानिक संशोधन व नाविन्यतेचा सामाजिक प्रभाव जास्तीत जास्त वाढवता येईल.

हे इको-एज्युकेशनल हब म्हणजेच वैज्ञानिक संशोधन, पर्यावरण शिक्षण, जैवविविधता संरक्षण, वनस्पती वारसा आणि सांस्कृतिक अर्थनिर्वचनाचा एक सुंदर संगम आहे. अशा प्रकारची पहिलीच पर्यावरण-शैक्षणिक सुविधा म्हणून विकसित केलेले हे केंद्र भारताच्या समृद्ध वनस्पती आणि सांस्कृतिक वारशाचे एक जिवंत भांडार म्हणून संकल्पित केले गेले आहे. हे केंद्र विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, निसर्गप्रेमी आणि सर्वसामान्य जनतेसाठी एक प्रत्यक्ष व सखोल अनुभव प्रदान करते.

हे हब वैज्ञानिक ज्ञान आणि जनसहभाग यांमधील एक थेट दुवा म्हणून काम करते. भारतातील वनस्पती विविधता, संवर्धनाचे प्रयत्न आणि वनस्पती वारसा अनुभवात्मक व संवादात्मक शिक्षणाद्वारे सोपा आणि सुलभ व्हावा, यासाठी यातील विविध सुविधांची रचना करण्यात आली आहे. अशा उपक्रमांमुळे वैज्ञानिक संस्था आणि समाज यांच्यातील नाते अधिक घट्ट होण्यास मदत होईल, तसेच वैज्ञानिक ज्ञानाच्या व्यावहारिक मूल्याबद्दल अधिक जागरूकता निर्माण होईल, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

 

* * *

सुषमा काणे/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2296598) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil