राज्यसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने आणि हवामान बदल यांवरील विभाग-संबंधित संसदीय स्थायी समितीच्या 413 व्या - 415 व्या अहवालांबाबत प्रसिद्धीपत्रक

प्रविष्टि तिथि: 07 AUG 2026 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2026

राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने आणि हवामान बदल या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समितीने शुक्रवार, 7ऑगस्ट, 2026 रोजी संसदेत खालील अहवाल सादर केला:-

1.दिल्ली एनसीआरमधील जलप्रदूषणावरील 402 व्या अहवालातील शिफारसी/निरीक्षणांबाबत सरकारने केलेल्या कारवाईचा आणि ते कमी करण्यासाठी विविध संस्थांनी उचललेल्या पावलांसंदर्भातील 413 वा अहवाल;

‘सीएसआयआर-सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स ऑर्गनायझेशन (CSIR-CSIO) आणि सीएसआयआर-इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (CSIR-IGIB) यांच्या कामकाजाचा आढावा’ यावरील 403 व्या अहवालातील शिफारसी/निरीक्षणांबाबत सरकारने केलेल्या कारवाईवरील 414 वा अहवाल; आणि

‘टाटा मेमोरियल सेंटर (TMC), भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) आणि न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) यांच्या कामकाजाचा आढावा’ यावरील 404 व्या अहवालातील शिफारसी/निरीक्षणांबाबत सरकारने केलेल्या कारवाईवरील 415 वा अहवाल.

2. समितीने दिनांक 05 ऑगस्ट, 2026 रोजी झालेल्या आपल्या बैठकीत मसुदा अहवालांवर विचार करून ते स्वीकारले होते.

3. हे अहवाल https://sansad.in/rs वर देखील उपलब्ध आहेत.


शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2296418) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी