पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी हातमाग हे भारताच्या महान सांस्कृतिक सामर्थ्याचे प्रतीक असल्याचे अधोरेखित करणारा लेख शेअर केला
Posted On:
07 AUG 2026 6:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी लिहिलेला लेख सामायिक केला. हा लेख भारताच्या महान सांस्कृतिक सामर्थ्यांपैकी एक असलेल्या हातमाग क्षेत्रावर आणि भारतीय वस्त्रोद्योगाच्या अगणित प्रादेशिक परंपरांवर प्रकाश टाकतो.
"केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या तरुणांना वारसा आणि तंत्रज्ञान, तसेच सर्जनशीलता आणि उद्यमशीलता याचा मेळ घालून हातमाग क्षेत्राचा पुढील अध्याय घडवण्याचे आणि त्याद्वारे विणकरांची उपजीविका बळकट करण्याचे आवाहन केले आहे," मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी यांनी X वर पोस्ट केले आहे:
भारत आज #NationalHandloomDay साजरा करत असताना, केंद्रीय मंत्री @girirajsinghbjp यांनी हातमाग क्षेत्राची, भारताचे सर्वात मोठे सांस्कृतिक सामर्थ्य म्हणून प्रशंसा केली आहे आणि भारतीय वस्त्रोद्योगाच्या अगणित प्रादेशिक परंपरा अधोरेखित केल्या आहेत.
हातमाग क्षेत्राच्या पुढील अध्यायाला आकार देण्यासाठी भारतातील तरुणांनी वारसा आणि तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि उपक्रम एकत्र आणावा, आणि त्याद्वारे विणकरांचे जीवनमान बळकट करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी केले आहे.
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2296228)
अभ्यागत कक्ष : 33
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam