सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडून 'हर घर तिरंगा 2026' चा शुभारंभ;


9 ते 17 ऑगस्ट 2026 दरम्यान देशभरात राबवले जाणार अभियान

प्रविष्टि तिथि: 06 AUG 2026 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2026

केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज नवी दिल्ली इथे देशव्यापी 'हर घर तिरंगा 2026' या अभियानाचा शुभारंभ केला. हे अभियान 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत देशभरात राबवले जाणार आहे. भारताच्या सर्वांत मोठ्या लोकसहभाग चळवळींपैकी एक म्हणून विकसित झालेल्या या अभियानात नागरिकांना अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवण्याचे, तसेच देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना साजरी करणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली इथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, 2022 मध्ये 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत सुरू झालेली 'हर घर तिरंगा' मोहीम आता एक वार्षिक राष्ट्रीय परंपरा बनली आहे, यात दर स्वातंत्र्यदिनी कोट्यवधी नागरिक स्वेच्छेने राष्ट्रध्वज फडकवतात. 'हर घर तिरंगा' ही आता केवळ ध्वजारोहणाची मोहीम राहिली नसून, तो लोकसहभाग, सांस्कृतिक कार्यक्रम, वारसा उपक्रम आणि डिजिटल सहभागाद्वारे चालवला जाणारा एक देशव्यापी उत्सव बनला आहे, असेही ते म्हणाले.

समाजातल्या कोणत्याही प्रदेशातल्या किंवा वर्गातल्या प्रत्येक भारतीयाला तिरंगा प्रेरणा देतो, यावर भर देताना शेखावत म्हणाले की, हे अभियान नागरिकांना 'विकसित भारत @ 2047' च्या संकल्पनेविषयी आपली बांधिलकी पुन्हा एकदा बळकट करण्याची संधी देते. याच काळात भारताचे राष्ट्रगीत 'वंदे मातरम' ला 150 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यामुळे या वर्षीच्या 'हर घर तिरंगा' अभियानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, म्हणून  हा उत्सव अधिक अर्थपूर्ण बनतो आणि व्यापक लोकसहभागाला प्रेरणा देतो, असेही त्यांनी नमूद केले.

या वर्षीचे अभियान भारताच्या 'वंदे मातरम' या राष्ट्रगीताच्या 150 वर्षांना समर्पित आहे, हे अभियान देशभक्तीच्या एका अनोख्या उत्सवामध्ये राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत एकत्र आणते. देशभरातल्या 'हर घर तिरंगा' उत्सवाचा 'वंदे मातरम' चे सामूहिक गायन हा एक अविभाज्य भाग असेल, असे त्यांनी सांगितले.


सुषमा काणे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2295821) आगंतुक पटल : 4
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English