नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रातील बंदरांचा विकास तसेच आधुनिकीकरण

प्रविष्टि तिथि: 04 AUG 2026 5:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2026 

भारतातील,विशेषतः पश्चिम किनारपट्टीवरील कार्गो आणि कंटेनर्सच्या वाहतुकीमध्ये होणारी अंदाजित वाढ लक्षात घेऊन केंद्र सरकारने डीप-ड्राफ्ट प्रकारच्या बंदराच्या गरजेचे मूल्यमापन केले आहे. अधिकृतरित्या वाढवण बंदर म्हणून ओळखले जाणारे हे डीप-ड्राफ्ट बंदर पालघर जिल्ह्यात, सर्व प्रकारच्या मोसमांमध्ये कार्यरत असलेले ग्रीनफिल्ड प्रकारचे प्रमुख डीप-ड्राफ्ट बंदर म्हणून विकसित करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 19.06.2024 रोजी 76,220 कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली. या बंदराचे काम पूर्ण झाल्यानंतर येथे दर वर्षी एकूण 298 दशलक्ष टन माल हाताळणी क्षमता निर्माण होईल असा अंदाज आहे.

वाढवण बंदराचे काम पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राच्या सागरी पायाभूत सुविधा, व्यापारी स्पर्धात्मकता, मालवाहतूकविषयक कार्यक्षमता, औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मिती यांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. वाढवण बंदराच्या विकासासाठी हाती घेण्यात आलेल्या आधुनिकीकरणाचे तसेच संपर्क जोडणी प्रकल्पांचे तपशील परिशिष्ट-I मध्ये दिले आहेत. महाराष्ट्रात आधुनिकीकरण तसेच बंदर जोडणीसाठी हाती घेण्यात आलेल्या इतर प्रकल्पांचे तपशील परिशिष्ट-II मध्ये दिले आहेत.

परिशिष्ट-I

वाढवण बंदराच्या विकासासाठी हाती घेण्यात आलेल्या आधुनिकीकरणाचे तसेच संपर्क जोडणी प्रकल्पांचे तपशील

Sl.No.

Project/Component

Estimated Cost

in ₹ crore

1

Nearshore reclamation and shore protection works

1648

2

Construction of 10.14 km Breakwater

5,301.26

3

Offshore reclamation under PPP-HAM

20,647

4

Dedicated Road Connectivity by NHAI (32.74 km)

2,528.76

5

Dedicated Rail Connectivity by Western Railway (22.22 km)

1,765

6

Water Supply Infrastructure

328

7

Power Supply Infrastructure

320

परिशिष्ट-II

महाराष्ट्रात आधुनिकीकरण तसेच बंदर जोडणीसाठी हाती घेण्यात आलेल्या इतर प्रकल्पांचे तपशील

Sl. No.

Project

Project Cost

in ₹ crore

1

Construction of Third Chemical Berth at Pir Pau

161

2

Development of New Fish Jetty at Mallet Bunder Fishing Harbour

96.60

3

Modernization, Development, Operation and Maintenance of Mumbai International Cruise Terminal (MICT) at Indira Dock

363.85

4

SCADA and PLC Automation System at Marine Oil Terminal

22.77

5

Construction of Approach road to Kharwadeshwari Jetty in Palghar District

15.00

6

Construction of Approach road to Narangi Jetty

29.41

7

Augmentation of firefighting facilities at Pir Pau Terminal of Mumbai Port

52.69

महाराष्ट्रातील प्रमुख बंदरांचे आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण, क्षमता वाढ तसेच संपर्क व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या एकंदर क्षमतेत 175.87 दशलक्ष टन प्रती वर्ष (एमएमटीपीए) इतकी तर मुंबई बंदर प्राधिकरणाच्या एकंदर क्षमतेत 88.66 एमएमटीपीए इतकी वाढ झाली आहे. अन्य  बंदरांचा विचार करता, या बंदरांच्या कामांसाठी संबंधित राज्य सरकार, खासगी बंदर परिचालक यांनी गुंतवणूक केली असून, महाराष्ट्रातील प्रमुख बंदरे वगळता, इतर बंदरांची एकंदर माल हाताळणी क्षमता 130.75 एमएमटीपीए पर्यंत पोहोचली आहे.

या उपक्रमांमुळे भारताचा आयात-निर्यात  व्यापार बळकट होईल, सुधारित रस्ते आणि रेल्वे जोडणी सुविधांमुळे मालवाहतूक कार्यक्षमता सुधारेल, तटवर्ती नौवहनाला चालना मिळेल, परदेशी पुनर्प्रेषण बंदरांवरील अवलंबित्व कमी होईल, बंदरांवर आधारित उद्योग तसेच मालवाहतूक संबंधी पायाभूत सुविधा यांच्या विकासात सुलभता येईल तसेच मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होतील.

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज राज्यसभेत दिलेल्या लेखी  उत्तरात ही माहिती दिली आहे.

सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2294424) आगंतुक पटल : 32
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी