संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एअर मार्शल तेजपाल सिंह यांनी हवाई दलाच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली

प्रविष्टि तिथि: 01 AUG 2026 3:57PM by PIB Mumbai


एअर मार्शल तेजपाल सिंह एव्हीएसएम व्हीएम यांनी 01 ऑगस्ट 26 रोजी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले आणि देशसेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली. 16 जून 1990 रोजी लढाऊ वैमानिक म्हणून सेवेत रुजू झालेल्या  एअर मार्शल तेजपाल सिंह यांच्याकडे 3500 तासांहून अधिक हवाई उड्डाणाचा अनुभव आहे. ते ‘कॅट ए’ क्वालिफाइड उड्डाण प्रशिक्षक आणि एक्सपेरिमेंटल टेस्ट पायलट आहेत. एअर मार्शल तेजपाल सिंह यांनी भारतीय हवाई दलात प्रमुख ऑपरेशनल, कमांड आणि स्टाफ पदे भूषवली आहेत.
त्यांच्या उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन, एअर मार्शल तेजपाल सिंह यांना राष्ट्रपतींच्या हस्ते जानेवारी 2011 मध्ये वायु सेना पदक आणि जानेवारी 2021 मध्ये अति विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.  
एअर मार्शल तेजपाल सिंह यांनी एअर मार्शल अवधेश कुमार भारती एसवायएसएम एव्हीएसएम व्हीएम यांच्याकडून हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. एअर मार्शल अवधेश कुमार भारती, आपल्या 39 वर्षांच्या गौरवशाली आणि उल्लेखनीय सेवेनंतर 31 जुलै 26 रोजी निवृत्त झाले.

***

सुषमा काणे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2293026) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu