जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जल जीवन मिशनला मुदतवाढ आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे हस्तांतरण


16.71% वरून 82.09% पर्यंत: जल जीवन मिशनमुळे ग्रामीण भागात नळाद्वारे पाणी पुरवठा व्यवस्थेचा कायापालट

प्रविष्टि तिथि: 27 JUL 2026 9:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,27 जुलै 2026

देशातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नियमित आणि दीर्घकालीन आधारावर, पुरेशा प्रमाणात (दरडोई दररोज 55 लिटर) आणि विहित गुणवत्तेचे (BIS:10500) पिण्यायोग्य पाणी नळाच्या जोडणीद्वारे मिळावे यासाठी ऑगस्ट 2019 पासून भारत सरकार राज्यांच्या सहकार्याने 'जल जीवन मिशन (जेजेएम) - हर घर जल' ची अंमलबजावणी करत आहे.

ग्रामीण भागातील कुटुंबांना नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जल जीवन मिशनच्या सुरुवातीपासून देशात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. जल जीवन मिशनच्या घोषणेच्या वेळी केवळ 3.23 कोटी (16.71%) ग्रामीण कुटुंबांकडे नळ जोडण्या असल्याची नोंद होती. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या माहितीनुसार, 18.07.2026 पर्यंत सुमारे 12.66 कोटी अतिरिक्त ग्रामीण कुटुंबांना नळाची जोडणी देण्यात आली आहे. अशा प्रकारे, 18.07.2026 पर्यंत देशातील एकूण 19.36 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी सुमारे 15.89 कोटी (82.09%) कुटुंबांच्या घरात नळाद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध झाला आहे. राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय तपशील परिशिष्टात दिला आहे.

मार्च 2026 मध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळाने जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत ग्रामीण पिण्याच्या पाणीपुरवठा क्षेत्रातील संरचनात्मक सुधारणांवर भर देत, वाढीव आर्थिक तरतुदीसह आणि पुनर्रचित अंमलबजावणीसह जल जीवन मिशनच्या कालावधीला डिसेंबर 2028 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे.

या मिशनची एकूण आर्थिक तरतूद आता 3.60 लाख कोटी रुपयांवरून 8.69 लाख कोटी रुपये करण्यात आली आहे. यात केंद्र सरकारचा हिस्सा 2.08 लाख कोटी रुपयांवरून वाढवून 3.59 लाख कोटी रुपये करण्यात आला आहे, म्हणजेच 1.51 लाख कोटी रुपयांची अतिरिक्त केंद्रीय तरतूद करण्यात आली आहे. जल जीवन मिशन  2.0 अंतर्गत प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी, प्रत्येक राज्याला/केंद्रशासित प्रदेशाला 'सर्वसमावेशक अंमलबजावणी आणि सुधारणा योजना' ही एक टप्प्याटप्प्याची आणि एकात्मिक चौकट तयार करावी लागेल. सीआयआरपी  योजना मिशनचे नियोजन, प्राधान्यक्रम, योजना व सुधारणांची अंमलबजावणी, निधी वाटप आणि देखरेख यासाठी मुख्य मार्गदर्शक आराखडा म्हणून काम करेल.

ही माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री  सी. आर. पाटील यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

Annex

State/ UT-wise details of progress made under JJM

(as on 18.07.2026)

(Number in lakhs)

S. No.

State/ UT

Total rural HHs

Rural HHs with tap water connection as on 15/08/2019

Rural HHs provided with tap water supply since Aug, 2019

Rural HHs with tap water supply as on date

No.

In%

No.

In%

No.

In%

1.

A & N Islands

0.62

0.29

46.02

0.33

53.98

0.62

100.00

2.

Arunachal Pradesh

2.29

0.23

9.97

2.06

90.03

2.29

100.00

3.

D&NH and D&D

0.85

-

-

0.85

100.00

0.85

100.00

4.

Goa

2.64

1.99

75.44

0.65

24.56

2.64

100.00

5.

Haryana

30.41

17.66

58.08

12.75

41.92

30.41

100.00

6.

Himachal Pradesh

17.09

7.63

44.64

9.46

55.36

17.09

100.00

7.

Mizoram

1.33

0.09

6.91

1.24

93.09

1.33

100.00

8.

Puducherry

1.15

0.94

81.33

0.21

18.67

1.15

100.00

9.

Punjab

34.27

16.79

48.98

17.48

51.02

34.27

100.00

10.

Telangana

53.98

15.68

29.05

38.30

70.95

53.98

100.00

11.

Gujarat

91.19

65.16

71.46

26.02

28.54

91.18

99.99

12.

Ladakh

0.41

0.01

3.49

0.38

94.71

0.40

98.19

13.

Uttarakhand

14.48

1.30

9.00

12.90

89.06

14.20

98.06

14.

Bihar

167.55

3.16

1.89

157.20

93.82

160.36

95.71

15.

Nagaland

3.64

0.14

3.82

3.34

91.88

3.48

95.69

16.

Sikkim

1.33

0.70

52.97

0.52

39.12

1.22

92.09

17.

Uttar Pradesh

267.20

5.16

1.93

239.99

89.82

245.15

91.75

18.

Lakshadweep

0.13

-

-

0.12

91.45

0.12

91.45

19.

Maharashtra

146.77

48.44

33.00

84.48

57.56

132.92

90.56

20.

Tamil Nadu

125.26

21.76

17.37

90.88

72.56

112.64

89.93

21.

Karnataka

101.24

24.51

24.21

64.96

64.16

89.47

88.37

22.

Tripura

7.51

0.25

3.26

6.24

83.16

6.49

86.42

23.

Meghalaya

6.51

0.05

0.70

5.43

83.36

5.47

84.06

24.

Chhattisgarh

49.95

3.20

6.40

38.56

77.20

41.76

83.60

25.

Assam

72.24

1.11

1.54

57.99

80.27

59.11

81.82

26.

Jammu & Kashmir

19.25

5.75

29.90

9.89

51.37

15.64

81.26

27.

Manipur

4.52

0.26

5.74

3.34

73.89

3.60

79.63

28.

Odisha

88.63

3.11

3.51

65.56

73.97

68.66

77.47

29.

Andhra Pradesh

95.53

30.74

32.18

41.37

43.30

72.11

75.48

30.

Madhya Pradesh

111.13

13.53

12.18

69.74

62.75

83.27

74.93

31.

Rajasthan

107.66

11.74

10.91

51.89

48.20

63.63

59.10

32.

West Bengal

175.51

2.15

1.22

97.61

55.62

99.76

56.84

33.

Jharkhand

62.52

3.45

5.52

31.21

49.92

34.66

55.44

34.

Kerala

70.76

16.64

23.52

22.38

31.63

39.02

55.14

 

Total

19,35.54

3,23.63

16.72

12,65.33

65.37

15,88.96

82.09

Delhi & Chandigarh have no rural population. HHs: Households Source: JJM – IMIS


निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2290192) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Kannada