युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'माय भारत' कार्यक्रमांतर्गत 1.22 लाखांहून अधिक तरुणांना अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रमांद्वारे प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध

प्रविष्टि तिथि: 27 JUL 2026 9:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,27 जुलै 2026

युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, 'मेरा युवा भारत' (एमवाय भारत) या उपक्रमाच्या माध्यमातून, सार्वजनिक संस्था आणि भागीदार संस्थांच्या सहकार्याने 'अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम' (इएलपी) राबवून सरकारी विभाग तरुणांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम बनवत आहेत. शैक्षणिक अध्ययनाला प्रत्यक्ष जगातील अनुभवाची जोड देण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या  या कार्यक्रमांमुळे तरुणांना सार्वजनिक सेवा वितरण आणि समुदाय सहभागाची ओळख होण्याबरोबरच त्यांच्यात कार्यविषयक, व्यावसायिक आणि नेतृत्वविषयक कौशल्ये विकसित होत आहेत. 'माय भारत' प्लॅटफॉर्म सुरू झाल्यापासून, 1.22 लाखांहून अधिक तरुणांनी सुमारे 25,000 अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे. त्यांनी या अंतर्गत  नेमून दिलेली कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली असून, 'माय भारत' पोर्टलद्वारे संयुक्तपणे प्रमाणित केलेली डिजिटल प्रमाणपत्रेही मिळवली आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनुसार तपशील सोबत जोडलेल्या परिशिष्टात देण्यात आला आहे.

हे कार्यक्रम सहभागींना यजमान संस्थांच्या मार्गदर्शनाखाली संरचित कामे पूर्ण करण्याची संधी देऊन शैक्षणिक शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव यांमधील दरी सांधतात. यामध्ये सहभागी होणारे युवक औपचारिक शिक्षणातून शिकलेल्या गोष्टींचा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी वापर करतात, संस्थात्मक प्रक्रियांचे निरीक्षण करतात आणि क्षेत्रीय तसेच कार्यालयीन उपक्रमांद्वारे प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतात. या कार्यक्रमांमध्ये आरोग्यसेवा, टपाल सेवा, कृषी, प्रसारण, रस्ते सुरक्षा, सार्वजनिक वितरण, प्रशासन आणि समुदाय विकास यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर, सहभागींना 'माय भारत' पोर्टलअंतर्गत जारी करण्यात आलेले संयुक्तरीत्या वैध  डिजिटल प्रमाणपत्र दिले जाते.

या कार्यक्रमांमध्ये आरोग्यसेवा, टपाल सेवा, अन्नसुरक्षा, कृषी, प्रसारण, रस्ते सुरक्षा, सेमीकंडक्टर तंत्रज्ञान, ज्येष्ठांची देखभाल आणि समुदाय विकास यांसारख्या क्षेत्रांचा समावेश असून कार्यक्रमाचा कालावधी आणि अंमलबजावणीच्या पद्धती या कार्यक्रमाच्या गरजांनुसार भिन्न असतात. विहित अटींची यशस्वी पूर्तता झाल्यानंतर, यजमान संस्था 'माय भारत' पोर्टलवर त्याची पडताळणी करून त्यानंतर संयुक्तपणे प्रमाणित केलेले डिजिटल प्रमाणपत्र जारी केले जाते.

'माय भारत' हा डिजिटल प्लॅटफॉर्म, कार्यान्वयन आराखडा, कार्यक्रमाचे निरीक्षण आणि प्रमाणपत्र निर्मितीची सुविधा उपलब्ध करून देते; तर संबंधित यजमान संस्था सहभागींची निवड, पर्यवेक्षण, उपस्थिती, कार्यक्रम पूर्ण झाल्याची पडताळणी आणि 'माय भारत' पोर्टलद्वारे प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी जबाबदार असतात. एनएसएस कार्यक्रम अधिकारी व प्लेसमेंट अधिकारी पात्र विद्यार्थ्यांमध्ये योग्य कार्यक्रमांमध्ये सहभागासाठी जागरूकता निर्माण करण्यास, त्यांना त्यामध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त करण्यास आणि मार्गदर्शनास मदत करतात.

ANNEXURE

The State/UT-wise details of Experiential Learning Programmes (ELPs) offered and applications received through the MY Bharat Portal are given below:

State/UT

Total ELP

ELP Applications

Andaman and Nicobar Islands

21

86

Andhra Pradesh

249

1432

Arunachal Pradesh

39

215

Assam

279

2818

Bihar

943

2296

Chandigarh

84

1144

Chhattisgarh

221

2212

Delhi

202

2388

Goa

163

1016

Gujarat

478

2762

Haryana

1205

7167

Himachal Pradesh

526

1488

Jammu & Kashmir

196

994

Jharkhand

239

1429

Karnataka

589

3580

Kerala

710

2662

Ladakh

12

122

Lakshadweep

13

63

Madhya Pradesh

439

2990

Maharashtra

9590

24245

Manipur

26

236

Meghalaya

51

250

Mizoram

20

104

Nagaland

38

213

Odisha

427

2202

Puducherry

82

460

Punjab

460

2486

Rajasthan

1017

10714

Sikkim

26

152

Tamil Nadu

995

6667

Telangana

157

1090

Dadra and Nagar Haveli and Daman and Diu

13

73

Tripura

224

1754

Uttar Pradesh

3465

21605

Uttarakhand

317

1144

West Bengal

1542

7496

All India

5

4722

Total

25063

122477


सुषमा काणे/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2290187) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati , Urdu , हिन्दी