खाण मंत्रालय
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी केशव चंद्र यांनी खाण मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
27 JUL 2026 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,27 जुलै 2026
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (1995: AGMUT) केशवचंद्र यांनी आज केंद्र सरकारच्या खाण मंत्रालयाच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला.
पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच त्यांनी खाण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि मंत्रालयाचे महत्त्वाचे उपक्रम तसेच सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला.

या बैठकीदरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सचिवांना मंत्रालयाच्या विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये खनिज उत्खनन, खनिज खंडांचे आणि ते कार्यान्वित करणे, महत्त्वपूर्ण व संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने आवश्यक खनिजे, तसेच खाण आणि खनिज क्षेत्राशी संबंधित इतर महत्त्वाच्या बाबींचा समावेश होता.
भारताचे खनिज क्षेत्र अधिक मजबूत करण्यासाठी मंत्रालयाच्या महत्त्वाच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि परस्पर समन्वयाने काम करण्याच्या महत्त्वावर खाण सचिवांनी विशेष भर दिला.
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2290136)
आगंतुक पटल : 10