ग्रामीण विकास मंत्रालय
गोव्यातील 'नक्शा' (NAKSHA) या प्रायोगिक प्रकल्पाबाबत भूसंपदा विभागाने वस्तुस्थिती स्पष्ट केली, मूळ जमिनीच्या नोंदी पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री दिली
प्रविष्टि तिथि:
24 JUL 2026 4:40PM by PIB Mumbai
मडगाव, कुंकळ्ळी आणि पणजी शहरातील मालमत्ताधारकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे, भूसंपदा विभागाचा शहरी मॅपिंगचा 'नक्शा' (NAKSHA) हा प्रमुख प्रायोगिक उपक्रम पुढील महत्वाच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. मालमत्तेच्या सीमा आणि जमिनीच्या मालकीहक्कांबाबत भीती आणि गोंधळ निर्माण करणाऱ्या, तसेच दिशाभूल करणाऱ्या अफवा असूनही, पडताळणीअंती समोर आलेली वस्तुस्थिती अशी आहे की, हा उपक्रम 'डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम (डीआयएलआरएमपी)’ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या सर्वात नागरिक-स्नेही डिजिटल गव्हर्नन्स कार्यक्रमांपैकी एक आहे. शहरी क्षेत्रांच्या मॅपिंगमध्ये अत्यंत अचूकता आणून, 'नक्शा' (NAKSHA) हा उपक्रम, जमिनीच्या सीमांबाबतचा गोंधळ दूर करण्यासाठी आणि स्थानिक जमीनमालकांना दीर्घकालीन सुरक्षितता प्रदान करण्यासाठी सज्ज आहे.
या आधुनिक जीआयएस आणि ड्रोन-आधारित मॅपिंग प्रणालीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, नागरिकांना भविष्यातील सीमा-विषयक विवादांपासून सुरक्षित ठेवण्याची याची क्षमता आहे . प्रक्रियेला 'ग्राउंड-ट्रूथिंग' या प्रक्रियेद्वारे प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थितीशी इलेक्ट्रॉनिक नकाशांची प्रत्यक्ष पडताळणी करून, हा प्रकल्प हे सुनिश्चित करतो की, तुमच्या जमिनीच्या प्रत्यक्ष सीमा अधिकृत नोंदींशी तंतोतंत जुळतील. यामुळे भविष्यातील विवादांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते, सामान्य नागरिकांना मानसिक शांतता मिळते आणि स्थानिक नगरपालिका संस्थांना आपल्या परिसरासाठी थेट उपयुक्त ठरणाऱ्या उच्च दर्जाच्या सार्वजनिक सुविधा आणि पायाभूत सुविधांचे नियोजन करणे शक्य होते.
या कार्यक्रमात मोजणीच्या वेळी अनुपस्थित असलेल्या जमीन मालकांचे हित जपण्यासाठी खास डिझाइन केलेली अंगभूत सार्वजनिक पडताळणी चक्रे आहेत, यामुळे सर्वेक्षणादरम्यान जमीन मालक प्रत्यक्ष उपस्थित राहिला नाही, तरी त्याच्या कायदेशीर मालकीवर कोणताही परिणाम होणार नाही याची खात्री मिळते.
ओसिया कमर्शियल आर्केड, एसजीपीडीए मार्केट, मडगाव येथील सर्वेक्षण आणि भूमी अभिलेख निरीक्षक (आयएसएलआर) यांच्या कार्यालयात 16 जुलै ते 14 ऑगस्ट 2026 या कालावधीत औपचारिक चौकशी प्रक्रिया सुरू राहील. नागरिकांना आपली मालकी हक्काची कागदपत्रे सादर करण्याची आणि डिजिटल युगात अचूकपणे मॅप करण्याची ही एक उत्तम संधी आहे. यासाठी कोणत्याही तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नाही, कारण सर्वेक्षणाशी संबंधित मदतनीस अधिकारी तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर सहाय्य करतील. चला, अफवा फेटाळून लावूया, पारदर्शकतेचा स्वीकार करूया, आणि गोव्यातील शहरी परिसर भावी पिढ्यांसाठी सुरक्षित करण्यासाठी एकत्रितपणे काम करूया.
***
सुषमा काणे/राजश्री आगाशे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2289035)
आगंतुक पटल : 26