पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी भारत-ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार तसेच सामाजिक सुरक्षा करार याबाबतचा लेख सामायिक केला
प्रविष्टि तिथि:
15 JUL 2026 2:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,15 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'भारत-ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार' (सीईटीए ) आणि 'सामाजिक सुरक्षा करार' यांवर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला. हा करार भारत-ब्रिटन भागीदारीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी म्हणाले की, हे दोन करार भारत आणि ब्रिटन यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करतील तसेच दोन्ही देशांच्या सामायिक आकांक्षांचे रूपांतर तेथील जनतेसाठी ठोस संधींमध्ये करतील.
मोदी यांनी नमूद केले की, सीईटीए मुळे अनेक महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये ब्रिटनच्या बाजारपेठेत पोहोच वाढवून भारतातील शेतकरी, उद्योजक आणि एमएसएमई यांना नवी चालना मिळेल. सामाजिक सुरक्षा करारामुळे ब्रिटनमध्ये तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना महत्वपूर्ण आधार मिळेल आणि भारतीय उद्योगांची स्पर्धात्मकता वाढेल असे ते म्हणाले.
मोदी यांनी 'एक्स' (X) वर पोस्ट केले:
भारत-ब्रिटन भागीदारीतील हा एक महत्त्वपूर्ण क्षण आहे!
सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार आणि सामाजिक सुरक्षा करार अंमलात आल्यामुळे, आमचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार आहेत. हे करार एकत्रितपणे आमच्या सामायिक आकांक्षांचे रूपांतर आमच्या जनतेसाठी ठोस संधींमध्ये करतील .
सीईटीएमुळे आमचे शेतकरी, उद्योजक आणि एमएसएमई यांना नवी चालना मिळेल. अनेक महत्वपूर्ण क्षेत्रांना ब्रिटनच्या बाजारपेठेत अधिक भक्कम प्रवेश मिळेल. तसेच, यामुळे तंत्रज्ञान, व्यावसायिक सेवा आणि नवोन्मेष या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढेल आणि कुशल भारतीय मनुष्यबळाच्या गतिशीलतेला चालना मिळेल.
सामाजिक सुरक्षा करारामुळे ब्रिटनमध्ये तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना मोठा आधार मिळेल आणि भारतीय उद्योगांची स्पर्धात्मकता अधिक मजबूत होईल.
हा क्षण आमच्या लोकशाही देशांमधील परस्पर विश्वास आणि व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक व नवोन्मेष आधारित भविष्यवेधी भागीदारी उभारण्याचा आमचा संकल्प दर्शवतो. भारत आणि ब्रिटन सामायिक समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करत राहतील.
#IndiaUKFTA
शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2284797)
आगंतुक पटल : 10