गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
जल-सुरक्षित शहरांच्या दिशेने : शहरी भारतात 'कॅच द रेन' मोहिमेला केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडून गती
‘कॅच द रेन’ उपक्रमांतर्गत 900 हून अधिक शहरी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रित : 1.21 लाख एकर जलस्रोत आणि़ 12,750 एकर क्षेत्रांच्या पुनरुज्जीवनासाठी काम सुरू
प्रविष्टि तिथि:
13 JUL 2026 9:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जुलै 2026
'‘कॅच द रेन ’' म्हणजेच पावसाचे पाणी साठवा -जिथे पडेल तिथे, जेव्हा पडेल तेव्हा, या अभियानाची गती कायम ठेवण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनानुसार, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय 'अमृत 2.0' अंतर्गत शहरी भारतातील विविध जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि जलस्रोत पुनरुज्जीवन उपक्रमांच्या माध्यमातून या देशव्यापी उपक्रमाच्या उद्दिष्टांना चालना देत आहे.
अमृत 2.0 अंतर्गत देशभरातील शहरे जलसुरक्षा आणि हवामान बदलांना तोंड देण्याची क्षमता मजबूत करण्यासाठी पर्जन्यजल संचयन, भूजल पुनर्भरण आणि शाश्वत जल व्यवस्थापनाला प्रोत्साहन देत आहेत. या मोहिमेत 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे 900 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी (यूएलबी) सक्रिय सहभाग घेतला आहे.
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, जलशक्ती मंत्रालयाच्या सहकार्याने राबवत असलेल्या जल शक्ती अभियान–जन भागीदारी (जे एस जे बी) 2.0 अंतर्गत, 79 महानगरपालिकांनी 1,99,278 पुनर्भरण संरचना हाती घेतल्या आहेत तर 738 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 73,036 पुनर्भरण संरचना राबविण्यात येत आहेत. यामुळे शहरी भागांतील भूजल पुनर्भरण आणि जलसंधारण प्रयत्नांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान मिळत आहे.
या प्रयत्नांना अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने वैज्ञानिक जलस्तर नकाशांकन आणि लक्ष्यित उपाययोजनांद्वारे भूजल पुनर्भरण वाढवण्यासाठी अमृत 2.0 अंतर्गत उथळ जलस्तर व्यवस्थापन (सॅम) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमामुळे शहरांमध्ये महत्त्वपूर्ण आणि ठोस परिणाम दिसून येत आहेत.
|

|

|
|
Recharge pits with injection bore wells construted in Burdwan, West Bengal and Vizingarim, Andhra Pradesh
|
|

|

|
|
Recharge structures under construction before monsoon in Korba, Chhattisgarh and Warangal, Telanga
|
|

|
|
Recharge pit with storage tank facility for rooftop rainwater harvesting in Itanagar
|
अमृत 2.0 च्या जलस्रोत पुनरुज्जीवन (डब्ल्यूबीआर) घटकाअंतर्गत जलसाठा सुधारण्यासाठी, भूजल पुनर्भरण वाढवण्यासाठी तसेच शहरी पूर प्रतिरोधक क्षमता मजबूत करण्यासाठी सुमारे 1.21 लाख एकर क्षेत्राचे पुनरुज्जीवन केले जात आहे. या उपाययोजनांमध्ये गाळ काढणे, पाण्याच्या प्रवेश व निर्गम मार्गांमध्ये सुधारणा, किनारा संरक्षण, सुशोभीकरण आणि जैवविविधता संवर्धन यांचा समावेश आहे.
या प्रयत्नांना पूरक म्हणून संपूर्ण शहरी भारतात 18,00 एकरांवर उद्याने आणि हरित जागांचे प्रकल्प विकसित केले जात आहेत. हे प्रकल्प सुलभ आणि चैतन्यमय सार्वजनिक जागांच्या निर्मितीद्वारे पर्यावरणीय शाश्वतता वाढवत आहेत, भूजल पुनर्भरणास मदत करत आहेत, शहरी उष्णतेचा ताण कमी करत आहेत आणि नागरिकांच्या जीवनाचा दर्जा सुधारत आहेत.
या उपक्रमांच्या माध्यमातून गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय "कॅच द रेन म्हणजेच पावसाचे पाणी साठवा-जिथे पडेल तिथे, जेव्हा पडेल तेव्हा " या दूरदृष्टीला हातभार लावत आहे.
"आज वाचवलेला प्रत्येक थेंब हा भावी पिढ्यांच्या जलसुरक्षेसाठीची गुंतवणूक आहे.”
* * *
सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2284315)
आगंतुक पटल : 9