संसदीय कामकाज मंत्रालय
संसदीय कामकाज मंत्रालयाद्वारे विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठीच्या 17 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा, 2024-25 च्या विजेत्यांचा गौरव
प्रविष्टि तिथि:
07 JUL 2026 8:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,7 जुलै 2026
संसदीय कामकाज मंत्रालयाने आज नवी दिल्ली येथील संसद भवन संकुलातील जीएमसी बालयोगी सभागृहात विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठीच्या 17 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा, 2024-25 चा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला होता.
कायदा आणि न्याय आणि संसदीय कामकाज (स्वतंत्र कार्यभार) राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यांनी यावेळी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील काश्मीर विद्यापीठाच्या विजेत्या विद्यार्थी संघाला अटल बिहारी वाजपेयी फिरती संसदीय ढाल आणि चषक प्रदान केले. स्पर्धेतील गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल सात विद्यापीठे/महाविद्यालयांना गटस्तरीय विजेतेपदाचे चषकही प्रदान करण्यात आले.

गट स्तरावरील विजेत्यांची यादी :
|
अनु क्र.
|
विद्यापीठ / महाविद्यालयाचे नाव
|
|
1.
|
डीएव्ही कॉलेज, जालंधर, पंजाब
|
|
2.
|
जादवपूर विद्यापीठ, कोलकाता, पश्चिम बंगाल
|
|
3.
|
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, महाराष्ट्र
|
|
4.
|
पंजाब केंद्रीय विद्यापीठ, भटिंडा, पंजाब
|
|
5.
|
एस.एस.एम.आर.व्ही. कॉलेज, बंगळुरू, कर्नाटक
|
|
6.
|
चाणक्य राष्ट्रीय विधी विद्यापीठ, पाटणा, बिहार
|
|
7.
|
कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुरुक्षेत्र, हरियाणा
|
उपस्थितांना संबोधित करताना अर्जुन राम मेघवाल यांनी संसदीय कार्यपद्धतीचे उत्कृष्ट प्रदर्शन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि ते केवळ देशाचे भविष्यच नाहीत, तर भविष्यातील नेते देखील आहेत असे नमूद केले. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी संदेशाचे स्मरण करून, मेघवाल यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे, आपल्या स्वप्नांचे उद्दिष्टांमध्ये रुपांतर करण्याचे आणि ती साकार करण्यासाठी सुनियोजित पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले. विद्यार्थी राष्ट्रउभारणीत मोलाचे योगदान देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



सुषमा काणे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2282249)
आगंतुक पटल : 15