नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानांतर्गत भारताने जागतिक हरित हायड्रोजन क्षेत्रात आपले नेतृत्व केले अधिक बळकट

प्रविष्टि तिथि: 02 JUL 2026 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जुलै 2026

 

राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानांतर्गत (एनजीएचएम) एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत, एसीएमई क्लीनटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ने (एसीएमई ग्रुप) आज आघाडीच्या जपानी कंपन्या आयएचआय कॉर्पोरेशनसोबत हरित अमोनियासाठी आणि मित्सुबिशी गॅस केमिकल कंपनी, आयएनसी. (एमजीसी) सोबत हरित मिथेनॉलसाठी दीर्घकालीन खरेदी करार केला आहे. नवी दिल्लीतील अटल अक्षय ऊर्जा भवन येथे आयोजित एका समारंभात हा करार झाला.

आयएचआय कॉर्पोरेशनसोबतच्या करारानुसार, एसीएमई दरवर्षी एकूण 4,05,000 टन (405) हरित अमोनियाचा पुरवठा करेल. या कराराला जपानच्या कमी-कार्बन अमोनियासाठीच्या 'कॉन्ट्रॅक्ट फॉर डिफरन्स' (सीएफडी) योजनेचा पाठिंबा असून ही योजना जपानच्या अर्थव्यवस्था व्यापार आणि उद्योग मंत्रालयामार्फत (एमईटीआय) राबवण्यात येत आहे. ही योजना जपानी खरेदीदारांना किंमत सहाय्य प्रदान करते, ज्यामुळे अशा आयातीची दीर्घकालीन व्यावसायिक व्यवहार्यता सुनिश्चित होते.

एसीएमईने मित्सुबिशी गॅस केमिकल कंपनी, आयएनसी. सोबत त्यांच्या ओडिशामधील पारादीप प्रकल्पातून दरवर्ष 1,00,000 टन (100 केटीपीए) हरित मिथेनॉलच्या पुरवठ्यासाठी 10 वर्षांचा करारही केला आहे. हा प्रकल्प जागतिक निष्कार्बनीकरणाच्या उद्दिष्टांशी, विशेषतः सागरी क्षेत्रातील उद्दिष्टांशी सुसंगत आहे आणि युरोपियन रिन्युएबल फ्युएल्स ऑफ नॉन-बायोलॉजिकल ओरिजिन (आरएफएनबीओ) च्या आवश्यकता तसेच स्वच्छ सागरी इंधनासाठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या (आयएमओ) मानकांची पूर्तता करण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे.

राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाच्या दृष्टीने या करारामुळे तीन महत्त्वपूर्ण परिणाम साध्य झाले आहेत असे, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारंगी यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रथम, हरित अमोनिया आणि हरित मिथेनॉलसाठी जपानसोबत बाजारपेठेची मजबूत जोडणी निर्माण झाली असून त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. दुसरे म्हणजे, भारतातील हरित हायड्रोजन क्षेत्र व्यावसायिकदृष्ट्या परिपक्व होत असल्याचे या करारांमधून स्पष्ट झाले असून भारतीय स्वच्छ इंधन जागतिक बाजारपेठेतील विश्वासार्ह पुरवठादार म्हणून उदयास येत आहे. आणि तिसरे म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर हरित हायड्रोजन आणि हरित अमोनियाच्या मूल्य साखळीच्या निर्मितीला चालना मिळाली आहे.

या कार्यक्रमात जपान सरकारच्या अर्थव्यवस्था व्यापार आणि उद्योग मंत्रालयाचे उपमंत्री ताकेहिको मात्सुओ यांनीही उपस्थितांना संबोधित केले. हे करार स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात भारत-जपान सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि आदर्श उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

 

* * *

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2280556) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Telugu