संरक्षण मंत्रालय
लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी उपलष्करप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
01 JUL 2026 9:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2026
लेफ्टनंट जनरल संदीप जैन (एव्हीएसएम, एसएम) यांनी आज व्हाइस चीफ ऑफ द आर्मी स्टाफ ( व्हीसीओएएस) या पदाचा कार्यभार स्वीकारला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे माजी विद्यार्थी असलेल्या जनरल जैन यांची जून 1988 मध्ये महार रेजिमेंट मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. जवळपास चार दशकांच्या आपल्या उत्कृष्ट सेवाकाळात, त्यांनी विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये आणि परिस्थितींमध्ये त्यांनी नेतृत्व आणि कर्मचारी नियोजनामध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
त्यांनी निम-वाळवंटी प्रदेशात तसेच दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत इन्फंट्री बटालियन सशस्त्र दलाचे नेतृत्व केले आहे. याव्यतिरिक्त, स्ट्राइक कोअर मधील इन्फंट्री ब्रिगेड, काउंटर इन्सर्जन्सी फोर्स आणि नॉर्दर्न कमांडमधील पिव्होट कोअरचे नेतृत्वही केले आहे. त्यांच्या कारकिर्दीतील अनुभवामध्ये ऑपरेशन पवन मधील सहभाग, इथिओपियामधील संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून केलेली सेवा, तसेच अति-उंचावरील प्रदेश आणि लाइन ऑफ कंट्रोल नियंत्रित सीमारेषा व ईशान्य भारतातील दहशतवादाविरोधी मोहिमांमधील सहभागाचा समावेश आहे. या जनरल दर्जाच्या अधिकाऱ्याने दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत एका सेक्टरचे विभागाचे नेतृत्वही केले होते.

लेफ्टनंट जनरलपदी पदोन्नती मिळाल्यावर, त्यांनी नॉर्दर्न कमांड मध्ये एका कोअरचे नेतृत्व केले. त्यानंतर त्यांनी दक्षिण कमांडमधील मुख्यालयात चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम पाहिले; तिथे त्यांनी क्षमता विकास, दलाची पुनर्रचना आणि एकूणच कार्यातील सज्जता यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. आर्मी कमांडर पदी नियुक्ती झाल्यानंतर, त्यांनी सदर्न कमांड चे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून जबाबदारी सांभाळली.
लेफ्टनंट जनरल जैन यांनी विविध लष्करी संरचना आणि मुख्यालयांमध्ये महत्त्वाची स्टाफ आणि कार्यकारी पदे भूषवली आहेत. त्यांच्या विविध नियुक्त्यांमुळे त्यांना पारंपरिक युद्धमोहिमा, बंडखोरीविरोधी कारवाया, अति-उंचावरील प्रदेशातील आव्हाने, संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमा आणि विविध भौगोलिक परिस्थितींमध्ये दलाची सज्जता याचा सखोल अनुभव मिळाला आहे.
आर्मी वॉर कॉलेज मधील हायर कमांड कोर्स आणि केनियामधील नॅशनल डिफेन्स कोर्स त्यांनी एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून पूर्ण केला आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवेची दखल घेत त्यांना अति विशिष्ट सेवा पदक आणि सेना पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
* * *
शैलेश पाटील/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2280152)
आगंतुक पटल : 9