कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी भारताच्या भावी पिढीतील कौशल्यवीरांना हुडकण्यासाठी इंडियास्किल्स काॅम्पिटिशन 2026-27 चा केला प्रारंभ; SIDH वर नोंदणी सुरू

प्रविष्टि तिथि: 30 JUN 2026 8:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जून 2026

 

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी इंडियास्किल्स काॅम्पिटिशन 2026-27 चा प्रारंभ केला. ही देशातील प्रमुख कौशल्य स्पर्धा असून 63 उद्योग-संबंधित कौशल्य श्रेणींमध्ये भारतातील सर्वात प्रतिभावान तरुणांना हुडकून काढणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना आपली प्रतिभा प्रदर्शित करण्याची संधी देणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे.

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत(एम एस डी ई) आयोजित आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (एन एस डी सी) ज्ञान व अंमलबजावणी भागीदार अशा सहकार्याने ही स्पर्धा तरुण कुशल व्यावसायिकांना उत्कृष्टतेच्या सर्वोच्च मानकांवर स्पर्धा करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवण्यासाठी एक राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देईल.

या प्रारंभासोबतच, स्किल इंडिया डिजिटल हब (SIDH) वर स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे, ज्यामुळे देशभरातील तरुणांना सहभागी होण्यासाठी एक पारदर्शक, सुलभ आणि डिजिटल व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. ही स्पर्धा जिल्हा, राज्य आणि प्रादेशिक स्पर्धांपासून राष्ट्रीय स्पर्धेपर्यंतच्या एका संरचित मार्गाचे अनुसरण करेल, जिथे वर्ल्डस्किल्स स्पर्धेसारख्या जागतिक व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यापूर्वी भारतातील सर्वोत्तम कुशल तरुणांची प्रगत प्रशिक्षण आणि मूल्यांकनासाठी निवड केली जाईल.

जयंत चौधरी म्हणाले, “इंडियास्किल्स ही केवळ एक स्पर्धा नाही; तर कौशल्याचे महत्त्वाकांक्षेत, उत्कृष्टतेचे संधीत आणि प्रतिभेचे राष्ट्रीय अभिमानात रूपांतर करणारे हे एक शक्तिशाली व्यासपीठ आहे. हे एका अशा नव्या भारताचे प्रतिबिंब आहे, जिथे कुशल तरुण केवळ नोकरीसाठीच नव्हे तर जगासाठीही तयार आहेत. जसजसे उद्योग विकसित होत आहेत आणि तंत्रज्ञान कामाचे भविष्य घडवत आहे, तसतसे जागतिक स्तरावरील प्रमाणित कौशल्ये, आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा यांच्या आधारे तरुणांना तयार करण्याची क्षमता हे भारताचे सर्वात मोठे सामर्थ्य ठरेल. इंडियास्किल्स 2026-27 हे देशभरातील प्रत्येक तरुण महत्त्वाकांक्षी व्यक्तीला पुढे येऊन आपली क्षमता दाखवण्यासाठी आणि जगाची कौशल्य राजधानी बनण्याच्या भारताच्या प्रवासाचा भाग होण्यासाठी एक आमंत्रण आहे.”

इंडियास्किल्स काॅम्पिटिशन 2026-27 मध्ये मागील सत्राप्रमाणेच भविष्यासाठी सज्ज आणि उद्योगांशी सुसंगत अशी तीच 63 कौशल्ये समाविष्ट असतील, ज्यामध्ये प्रगत उत्पादन, बांधकाम, डिजिटल तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, आतिथ्यसेवा, वाहतूक, सर्जनशील उद्योग आणि उदयोन्मुख क्षेत्रांचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी, भेट द्या: https://www.skillindiadigital.gov.in/home

Registration link: https://www.skillindiadigital.gov.in/india-skills-competition

 

* * *

सुषमा काणे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2279593) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी