आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेची 16वी परिषद संपन्न


निरोगी भारत हाच विकसित भारत 2047 चा पाया आहे : केंद्रीय आरोग्यमंत्री

प्रविष्टि तिथि: 29 JUN 2026 8:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जून 2026

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेची (सीसीएचएफडब्ल्यू) 16वी परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत प्रमुख राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच सार्वजनिक आरोग्याच्या उदयोन्मुख प्राधान्यक्रमांवर विचारविनिमय करण्यात आला, आणि देशभरात आरोग्य सेवा अधिक प्रभावी बनावी याकरिता केंद्र-राज्य सहकार्य मजबूत करण्यासाठी ही परिषद एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने जेव्हा देश स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण करेल म्हणजेच 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याचे ध्येय ठेवले आहे, असे या परिषदेला संबोधित करताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा म्हणाले. निरोगी भारताशिवाय विकसित भारताचे ध्येय साध्य होऊ शकत नाही आणि आरोग्य हा राष्ट्रीय विकासाच्या सर्वात महत्त्वाच्या स्तंभांपैकी एक आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.

गेल्या बारा वर्षांत भारताच्या आरोग्यसेवा क्षेत्रात आमूलाग्र बदल झाल्याचे नड्डा यांनी सांगितले. प्रमुख आरोग्य निर्देशकांमधील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकत केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले की, माता मृत्यू दर (एमएमआर) 2014 मधील प्रति एक लाख जिवंत प्रसूतींमध्ये 130 वरून 87 पर्यंत कमी झाला आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या 'माता मृत्यू अंदाज अहवाल 2024' चा संदर्भ देत त्यांनी नमूद केले की, जागतिक स्तरावर ही घट 48 टक्के घट झाली असताना, भारताने माता मृत्यूदरात 86 टक्के घट साधली आहे. भारतासारख्या लहान देशासाठी ही एक उल्लेखनीय कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले.

नड्डा यांनी मिशन इंद्रधनुषच्या कामगिरीवरही प्रकाश टाकला. जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक क्षयरोग अहवालानुसार, क्षयरोगाच्या रुग्णसंख्येत जागतिक स्तरावर 12 टक्के घट झाली असताना, भारतात ही घट 21 टक्के नोंदवण्यात आली आहे, असे संसर्गजन्य रोगांच्या नियंत्रणाबद्दल बोलताना नड्डा यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी या परिषदेत देशभरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम बनवण्याच्या उद्देशाने अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक दस्तऐवज प्रकाशित केले आणि विविध उपक्रमांचे उद्घाटन केले.

प्रमुख उपक्रम पुढील प्रमाणे आहेत:

‘राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा (एनएएस), 2026 करिता कार्यप्रणाली मार्गदर्शक तत्त्वे’

‘सुमन रोडमॅप 2030’ (SUMAN Roadmap 2030) चे प्रकाशन - देशभरातील माता आणि नवजात बालकांच्या आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी तयार केलेली एक व्यापक धोरणात्मक चौकट.

‘समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ (एसएसबीएसके) चा प्रारंभ.

‘ॲनिमिया मुक्त भारत अभियाना’चा प्रारंभ

 

* * *

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2279197) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil