ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्रामीण विकास विभागाच्यावतीने भारत मंडपमध्‍ये "एआयच्या आधारे ग्रामीण विकास" या विषयावर कार्यशाळा


निती आयोग,इंडिया एआय मिशन , शिक्षण क्षेत्र तसेच स्टार्ट अप्स यांच्या वतीने ग्रामीण क्षेत्राच्या परिवर्तनासाठी एआय प्रणित उपाययोजनांवर करणार शोधकार्य

प्रविष्टि तिथि: 24 JUN 2026 11:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जून 2026

ग्रामीण विकास मंत्रालयाचा ग्रामीण विकास विभाग, 25 जून 2026 रोजी नवी दिल्लीत भारत मंडपम येथे “एआयचा आधारे ग्रामीण विकास” या विषयावर कार्यशाळा आयोजित केली आहे. संपूर्ण दिवसभर चालणारी ही कार्यशाळा ,तंत्रज्ञानातील अत्याधुनिक संशोधन आणि ग्रामीण भारतातील तळागाळाच्या विकासात्मक गरजा यांचा मेळ घालण्यासाठी समन्वयक मंच म्हणून काम करेल.

निती आयोग, इंडिया एआय मिशन यांच्यासह महत्त्वाचे संबंधित, औद्योगिक सल्लागार कंपन्या तंत्रज्ञानातील स्टार्ट अप्स, शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती, आणि ज्ञान क्षेत्रातील भागीदार एकत्र येत असून,ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार देण्याची क्षमता यावर विचार विनिमय करतील.

कार्यशाळेची उद्दिष्टे

ग्रामीण विकासाच्या दृष्टीने तयार केलेल्या, ‘ए आय’चे  मापन करता येईल एवढा वापर असलेल्या व्यवस्था आणि उत्तम प्रकारे परिणामकारक अशा गोष्टींचा शोध घेतला जाईल. यावेळी  औद्योगिक भागीदार आणि शैक्षणिक क्षेत्राकडून अंमलबजावणीची दृष्टी आणि  संस्थात्मक शिक्षण याशिवाय माहितीच्या पर्यावरणाच्या तात्काळ उपयोजनाचे मापन त्यानंतर या तंत्रज्ञानाचा देशव्यापी स्वीकार करण्यासाठी आवश्यक असणारी संस्थात्मक चौकट निर्माण करणे,  असे या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे.

संकल्पनात्मक सत्रे

या कार्यशाळेतील तंत्रज्ञानावरील विचारविनिमय पाच संकल्पनांच्या सत्रांवर आधारित असतील.

"ए आय, डी पी आय ( डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर) आणि नवोन्मेषी तंत्रज्ञान - ग्रामीण शासनाच्या भवितव्याची पायाभरणी" या विषयावर  पहिले सत्र असेल. ग्रामीण शासन आणि प्रशासकीय व्यवस्थांच्या आधुनिकीकरणासाठी ए आय आणि भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डी पी आय) यांचा मेळ घालणे हे या सत्राचे उद्दिष्ट असेल..

दुसरे सत्र  "नागरिक केंद्रित ग्रामीण सेवा प्रदान आणि सामाजिक सुरक्षा यासाठी ए आय" या विषयावर असणार आहे.  ग्रामीण भागातील नागरिकांसाठी कल्याणकारक योजनांचे लाभ पोचवण्यात अल्गोरिदमिक मॉडेल्सचा वापर करून अशा लाभांची परिणामकारकता , पारदर्शकता आणि योग्य व्यक्तीपर्यंत लाभ पोहोचण्याची सुनिश्चिती यावर विचारविनिमय होईल.

तिसरे सत्र "ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, हवामानबदलाच्या बाबतीतील लवचिकता आणि निधी व्यवस्थापन यासाठी ए आय" या विषयावर असणार आहे.सार्वजनिक कामांच्या व्यवस्थापनात अंदाज बांधू शकणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यायोगे हवामानासंबंधित धोक्याची तीव्रता कमी करणे, मालमत्तेचा आपोआप घेतला जाणारा माग यावर या सत्रात विचार विनिमय होईल. 

चौथे सत्र "ग्रामीण रोजगार कौशल्याचा वापर आणि आर्थिक सबलीकरणासाठी ए आय" या विषयावर घेतले जाईल. या सत्रात ग्रामीण उद्योगांना बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान आधारित मार्ग, ग्रामीण युवांमधील कौशल्य वाढवणे तसेच आर्थिक सेवांकडे त्यांचा ओघ वाढवणे यावर या सत्रात काम केले जाईल.

पाचवे सत्र "शासन, धोरण आणि श्रेणी वर्धनासाठी मार्ग, ए आयची जबाबदारी" हे असेल. हे सत्र ग्रामीण भारतात डेटाची गोपनीयता राखणे, नैतिक ए आय चौकट धोरणात्मक समन्वय आणि ए आय आधारित मध्यस्थांचे मापन करण्यासाठी मार्ग यावर विचार विनिमय करेल.

मोठ्या प्रमाणावरचा सहभाग 

विषय तज्ञ, धोरणकर्ते, उद्योगातील धुरीण  आणि संशोधक यांचा सहभाग या कार्यशाळेतील विस्तृत पॅनल चर्चांमध्ये असेल. नीती आयोग, इंडिया एआय मिशन ,शिक्षण क्षेत्रातील आणि  माहिती क्षेत्रातील संस्था आणि डीप टेक स्टार्टअपमधील संबंधित विशेषज्ञ तसेच वक्ते या कार्यशाळेत मोठ्या प्रमाणावर भाग घेतील आणि त्यांचा अनुभव याशिवाय ग्रासरूट स्तरावर आवश्यक असणाऱ्या प्राथमिक आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजना सामायिक करतील,

या कार्यशाळेतून मिळालेला संपूर्ण दृष्टिकोन हा भारताच्या ग्रामीण विकासाच्या पर्यावरणामध्ये सुरक्षित मजबूत आणि परिणामकारक अंतर्भूत करण्यासाठी धोरणात्मक आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावेल अशी खात्री  आहे.
 
सुवर्णा बेडेकर/विजया सहजराव/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2277616) आगंतुक पटल : 4
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil