राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचा रायरंगपूर येथे ओडिशा सरकारच्या दोन वर्षांच्या कार्यपूर्ती कार्यक्रमात सहभाग ; रु. 47,600 कोटींच्या विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन, भूमिपूजन


विकासाचे लाभ प्रत्येक गाव, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचतात त्याचवेळी विकास कामे ठरतात अर्थपूर्ण : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्रविष्टि तिथि: 20 JUN 2026 6:58PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (20 जून 2026) ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर येथे ओडिशा सरकारच्या दोन वर्षांच्या कार्यपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी संयुक्तपणे ऊर्जा, औद्योगिक पायाभूत सुविधा, रस्ते संपर्क, पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, पर्यटन आणि सिंचन या क्षेत्रांतील 60 प्रकल्पांचे उद्घाटन केले तसेच 12 प्रकल्पांचे भूमिपूजन केले. रु. 47,600 कोटी मूल्याचे हे प्रकल्प प्रादेशिक संपर्क अधिक बळकट करणे आणि प्रदेशाच्या आर्थिक विकासाला चालना देणे या उद्देशाने राबविण्यात येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मयूरभंजच्या भूमीत स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, व्यग्र वेळापत्रक असूनही त्यांनी रायरंगपूरला दिलेली भेट ही ओडिशाबद्दल असलेल्या त्यांच्या विशेष प्रेमाची आणि आदराची साक्ष आहे. या भेटीमुळे रायरंगपूरमधील जनतेला, विशेषतः आदिवासी बंधू-भगिनींना, अपार आनंद झाला आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आज भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले ते प्रकल्प केवळ विकासाची प्रतीके नसून सामाजिक न्याय, समान संधी आणि सर्वांगीण विकास यांच्याविषयी असलेल्या बांधिलकीचे द्योतक आहेत.

राष्ट्रपती म्हणाल्या की, ज्यावेळी विकासाचे लाभ प्रत्येक गाव, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचतात, त्याचवेळी विकास अर्थपूर्ण ठरतो. आदिवासी क्षेत्रे, दुर्गम भाग आणि आकांक्षी जिल्ह्यांमधील मानवी विकास निर्देशांकांमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणणे हे आपले प्राधान्य आहे. या दिशेने आपण लक्षणीय प्रगती साधली आहे.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

***

सुवर्णा बेडेकर/नितीन गायकवाड/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2275843) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Odia , Malayalam