संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आत्मनिर्भर भारत:  संरक्षण मंत्रालयाने, भारतीय नौदलासाठी 1.25 एमडब्लू मरीन गॅस टर्बाइन जनरेटर्सच्या १२ संचांसाठी 425 कोटी रुपयांचा केला करार

प्रविष्टि तिथि: 19 JUN 2026 5:26PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदलासाठी, 1.25 एमडब्लू मरीन गॅस टर्बाइन जनरेटर्सच्या 12 संचांसाठी संरक्षण मंत्रालयाने, पुण्याच्या भारत फोर्ज लिमिटेड कंपनीसोबत 425 कोटी रुपयांचा करार केला आहे. या संचासाठी लागणाऱ्या समानातील, 60 टक्के माल स्वदेशी असेल. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत, आज (19 जून, 2026) रोजी हा करार, (भारतीय) खरेदी श्रेणीत करण्यात आला आहे.

या कराराद्वारे, आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया बद्दलची सरकारची कटिबद्धता अधिकच दृढ झाली असून, त्यातून, देशांतर्गत उत्पादन व्यवस्थेला मोठे पाठबळ मिळणार आहे. यातून, महत्वाच्या सामरिक तंत्रज्ञानात, सागरी क्षेत्रात भारताला आत्मनिर्भरता साध्य करता येईल तसेच, देशांतर्गत उत्पादने आणि एंड- टू- एंड जीवनचक्र पाठबळामुळे, नौदलाची कार्यक्षमता आणि तत्परता वाढेल.

सागरी वायू टर्बाइन जनरेटर्स उत्पादन करण्यासाठी देशांतर्गत क्षमता वाढवण्याच्या दिशेने , हा करार एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. आधुनिक नौदल सज्जतेत वीजनिर्मिती करणारे जनरेटर अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडते. हे जनरेटर, अत्यंत महत्वाच्या अशा लढाऊ प्रणालींना आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांना  ऊर्जा पुरवठा करण्यास उपयुक्त ठरते.

***

शैलेश पाटील/राधिका अघोर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2275416) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी