राज्यसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

शिक्षण, महिला, बाल, युवा आणि क्रीडाविषयक संसदीय स्थायी समितीने सादर केलेल्या 380 वा अहवालासंबंधी प्रसिद्धीपत्रक

प्रविष्टि तिथि: 16 JUN 2026 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जून 2026

राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विभाग संबंधित  शिक्षण, महिला, बाल, युवा आणि क्रीडाविषयक संसदीय स्थायी समितीने आज दि. 16 जून 2026 रोजी आपला 380 वा अहवाल राज्यसभेच्या सभापतींना सादर केला.

हा अहवाल  राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) कामकाजाचा आढावा आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020  अंतर्गत शिक्षकांच्या क्षमता बांधणीवर असलेला भर, यानुसार त्यांच्या प्रशिक्षणाला पाठबळ देण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमांविषयी संसदेने 368 व्या अहवालात काही शिफारसी केल्या होत्या, तसेच काही निरीक्षणेही नोंदवली होती. या शिफारसींवर सरकारने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या 380 व्या अहवालात अंतर्भूत करण्यात आला आहे.

या संदर्भातील कार्यवाही अहवालावर समितीच्या 21 मे 2026 रोजी झालेल्या बैठकीत सविस्तर विचार करून तो स्वीकारण्यात आला होता.

हे अहवाल खाली नमूद दुव्यावरही उपलब्ध करून देण्यात आले आहेत:

https://sansad.in/rs/committees/16?departmentally-related-standing-committees


सोनाली काकडे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2273724) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी