संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

श्रीलंकेतील कोलंबो येथे आयएनएस शारदा जहाजाची यशस्वी भेट

प्रविष्टि तिथि: 14 JUN 2026 3:30PM by PIB Mumbai

 

भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सागरी सहकार्य आणि मैत्री अधिक दृढ करणारी भेट यशस्वीरित्या पूर्ण करत आयएनएस शारदा 13 जून 2026 रोजी कोलंबो बंदरावरून रवाना झाली. श्रीलंकेच्या नौदलासमवेत विविध व्यावसायिक, प्रशिक्षण आणि क्रीडा उपक्रम या भेटी दरम्यान राबवण्यात आले.

क्षमता-बांधणी उपक्रमांचा भाग म्हणून, श्रीलंकेच्या नौदल कर्मचाऱ्यांनी लहान शस्त्रास्त्रांचा वापर, मूलभूत अग्निशमन, प्रथमोपचार आणि बचाव कार्य पद्धती यांसारख्या प्रशिक्षणांमध्ये सहभाग घेतला. या भेटीदरम्यान, श्रीलंकेच्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे रिअर अँडमिरल जगनाथ कुमार यांनी जहाजाला भेट दिली आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यातून दोन्ही देशांमधील बळकट सागरी भागीदारीची कटिबद्धतेची पुष्टी झाली.

दोन्ही दलांदरम्यान मैत्रीपूर्ण क्रीडा सामने, व्यावसायिक देवाणघेवाण आणि परस्परांच्या जहाजांना भेटी यांमुळे परस्पर कार्यक्षमता आणि परस्परसंबंध यांना अधिक बळकटी मिळाली.

या भेटीदरम्यान, आयएनएस शारदा जहाजाच्या कमांडिंग ऑफिसरने श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त संतोष झा यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीतून भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यानची दीर्घकालीन सागरी भागीदारी अधोरेखित झाली. तसेच महासागर या (विविध क्षेत्रांमधील सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर व सर्वसमावेशक प्रगती ) संकल्पनेनुसार प्रादेशिक सागरी सहकार्य आणि सुरक्षा यांच्याविषयी असलेल्या सामायिक वचनबद्धतेचा पुनरूच्चार करण्यात आला.

***

शैलेश पाटील/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2272675) आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी