श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जिनिव्हा येथे 114 व्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेच्या निमित्ताने जागतिक सामाजिक न्याय आघाडीच्या समन्वय गटाची बैठक संपन्न

प्रविष्टि तिथि: 12 JUN 2026 4:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2026

केंद्रीय कामगार आणि रोजगार तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री, शोभा करंदलाजे, स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आयोजित 114 व्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. 11 जून 2026 रोजी करंदलाजे यांनी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेच्या  निमित्ताने आयोजित जागतिक सामाजिक न्याय आघाडीच्या समन्वय गटाच्या बैठकीत सहभाग घेतला.

या बैठकीदरम्यान, शोभा करंदलाजे यांनी आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेचे  महासंचालक, बांगलादेश, मोल्दोव्हा, ब्राझील आणि  स्वित्झर्लंडचे कामगार मंत्री, बेल्जियमचे उपमंत्री आणि इतर प्रतिष्ठित भागीदारांची भेट घेतली.

भारताने आघाडीची उद्दिष्ट्ये पुढे नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद, सरकारे, नियोक्ता  आणि  कामगार संघटना आणि इतर हितधारकांसोबत मिळून काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

सर्वसमावेशक विकासाला चालना देणे, सामाजिक संरक्षण संस्थांचे बळकटीकरण, जबाबदार व्यावसायिक पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि न्याय्य तसेच सक्षम कामगार बाजारपेठेसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्यासाठी या माध्यमांतून समन्वय गटाच्या पुढील बैठकीत अधिक सक्रिय सहभाग देण्यासाठी भारत उत्सुक आहे.


सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(रिलीज़ आईडी: 2272127) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Kannada