कृषी मंत्रालय
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 2025-26 साठी बागायती पिकांचे क्षेत्रफळ आणि उत्पादनाचा दुसरा अग्रिम अंदाज प्रसिद्ध केला
2025-26 मध्ये बागायती लागवडीचे क्षेत्र 301.51 लाख हेक्टरपर्यंत पोहोचण्याची शक्यता
2025-26 मध्ये देशातील बागायती उत्पादन सुमारे 3777.76 लाख टन राहण्याचा अंदाज
प्रविष्टि तिथि:
11 JUN 2026 9:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2026
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि इतर शासकीय संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संकलित केलेला विविध बागायती पिकांच्या क्षेत्र आणि उत्पादनाचा 2025-26 चा दुसरा आगाऊ अंदाज प्रसिद्ध केला आहे.
| एकूण फलोत्पादन |
2024-25
(अंतिम)
|
2025-26
(पहिला आगाऊ अंदाज)
|
2025-26
(दुसरा आगाऊ अंदाज)
|
|
क्षेत्र
(लाख हेक्टरमध्ये)
|
301.36 |
301.31 |
301.51 |
|
उत्पादन
(लाख टनांमध्ये)
|
3707.38 |
3708.46 |
3777.76 |
2025-26 ची ठळक वैशिष्ट्ये (दुसरा आगाऊ अंदाज):
- देशातील फलोत्पादन क्षेत्र 2025-26 मध्ये सुमारे 301.51 लाख हेक्टर राहील अशी अपेक्षा आहे, जे 2024-25 (अंतिम) च्या तुलनेत 0.14 लाख हेक्टर (0.05%) नी अधिक आहे.
- देशातील फलोत्पादन 2025-26 मध्ये सुमारे 3777.76 लाख टन राहण्याचा अंदाज आहे, जे 2024-25 (अंतिम) च्या तुलनेत 70.39 लाख टन (1.90%) नी अधिक आहे.
- फळे, भाजीपाला, फुले आणि सुगंधी व औषधी पिकांच्या उत्पादनात वाढ अपेक्षित आहे.
- केळी, आंबा, पपई, सफरचंद आणि पेरू यांच्या वाढलेल्या उत्पादनामुळे फळांचे उत्पादन 2024-25 मधील 1176.49 लाख टनांवरून 3.25% ( 38.26 लाख टन) वाढून 2025-26 मध्ये 1214.75 लाख टन होण्याची अपेक्षा आहे.
- 2024-25 च्या तुलनेत कांदा लागवडीखालील क्षेत्रात 2.31% (0.46 लाख हेक्टर) वाढ अपेक्षित आहे, म्हणजेच 2024-25 मधील 19.68 लाख हेक्टरवरून 2025-26 मध्ये ते 20.14 लाख हेक्टर होईल. 2024-25 मधील 307.67 लाख टनांच्या तुलनेत 2025-26 मध्ये कांद्याचे उत्पादन 307.37 लाख टन राहण्याची अपेक्षा आहे.
- बटाट्याचे उत्पादन 598.89 लाख टन राहण्याची अपेक्षा आहे, जे 2024-25 मधील 585.71 लाख टनांच्या तुलनेत 13.18 लाख टनांनी (2.25%) अधिक आहे.
- टोमॅटोचे उत्पादन 214.61 लाख टन अपेक्षित आहे, जे 2024-25 मधील 205.99 लाख टनाच्या तुलनेत 8.62 लाख टनांनी (4.19%) जास्त आहे.
- 2024-25 च्या तुलनेत फुलशेती क्षेत्रात 0.66% वाढ अपेक्षित आहे.
- लसूण, हळद, कढीपत्ता आणि मेथी यांच्या उत्पादनात वाढ अपेक्षित आहे.
* * *
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2271900)
आगंतुक पटल : 7