पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी सर्व सजीवांचे कल्याण आणि निसर्गाशी सुसंवाद राखण्याला अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले

Posted On: 08 JUN 2026 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जून 2026

निसर्गाशी समतोल साधून सर्व सजीवांचे कल्याण साधणे हीच आपल्या संस्कृतीची मूळ भावना राहिली असल्याचे अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केले.

याच व्यापक दृष्टीकोनातून भारत आज प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर सतत पुढे जात आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिलेः

"निसर्गाशी समतोल साधून सर्व जीवांचे कल्याण व्हावे, हीच आपल्या संस्कृतीची मूळ भावना राहिली आहे. याच व्यापक दृष्टीकोनातून  भारत आज प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर सतत पुढे जात आहे.

यावच्चतस्रः प्रदिशश्चक्षुर्यावत् समश्नुते।

तावत् समैत्विन्द्रियं मयि तद्धस्तिवर्चसम्॥"

आपल्याला अशी समृद्धी लाभो जी चारही दिशांच्या अथांग विस्ताराने आणि डोळ्यांच्या दृष्टीच्या सजग जाणिवेने परिपूर्ण असेल - जिथे निसर्गाशी पूर्ण सुसंवाद साधून जगताना पर्यावरणाचे रक्षण होईल आणि सर्व जीवांचे शाश्वत कल्याण सुनिश्चित केले जाईल.


 

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2270393) अभ्यागत कक्ष : 48