पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी गुजरातच्या हाजिरा इथल्या एल अँड टी संकुलाला दिली भेट

Posted On: 05 JUN 2026 9:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या हाजिरा येथील लार्सन अँड टुब्रो संकुलाला भेट दिली आणि तिथे कंपनीतर्फे विविध क्षेत्रांत विकसित केल्या जात असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली.

भारताच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेला चालना देण्यात एल अँड टी ने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. या केंद्रात अभियांत्रिकी क्षेत्रातील कामगिरीची आणि प्रगतीची त्यांनी प्रशंसा केली.

'X' वर पंतप्रधान म्हणाले:

"आज दुपारी हाजिरा इथल्या एल अँड टी संकुलाला भेट दिली. तिथे विविध क्षेत्रांत कंपनीतर्फे विकसित केल्या जात असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेला चालना देण्यात एल अँड टीने बजावलेली भूमिका कौतुकास्पद आहे.

@larsentoubro"

 

"गुजरातच्या हाजिरा इथल्या एल अँड टी संकुलाला दिलेल्या भेटीची आणखी काही दृश्ये"

 

* * *

राधिका अघोर/पर्णिका हेदवकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2269602) अभ्यागत कक्ष : 48