सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विषयक स्थायी समितीची मुंबईच्या राष्ट्रीय वाचा आणि श्रवण दिव्यांगता संस्थेला भेट
संसदीय शिष्टमंडळाने संस्थेच्या दौऱ्यादरम्यान घेतला शैक्षणिक व वैद्यकीय सेवांचा आढावा
प्रविष्टि तिथि:
03 JUN 2026 10:14PM by PIB Mumbai
मुंबई, 3 जून 2026
मुंबई येथील अलीयावर जंग राष्ट्रीय वाचा आणि श्रवण दिव्यांगजन संस्था [AYJNISHD(D)] येथे आज संसदीय स्थायी समितीचे (सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, 2025-26) अध्यक्ष पी. सी. मोहन आणि इतर समिती सदस्यांनी आपल्या अभ्यास दौऱ्यानिमित्त भेट दिली.

संस्थेचे संचालक डॉ. सुमन कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अध्यक्ष व त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाचे अत्यंत उत्साहात आणि आदरपूर्वक स्वागत केले. याप्रसंगी डॉ. सुमन कुमार यांनी उपस्थित मान्यवरांची संस्थेच्या विविध विभागप्रमुखांशी ओळख करून दिली, ज्यामुळे संस्थेच्या विविधांगी उपक्रमांवर व योजनांवर सविस्तर आणि फलदायी चर्चा होऊ शकली.
या दौऱ्याची सुरुवात 'क्रॉस डिसेबिलिटी अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर'मधील चिमुकल्यांनी आणि 'बी.एड. विशेष शिक्षण (कर्णबधिरत्व)' अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक स्वागतपर कार्यक्रमाने झाली. यानंतर, संस्थेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या वेळी संस्थेच्या संचालकांनी एका सर्वसमावेशक सादरीकरणाद्वारे संस्थेचा आतापर्यंतचा प्रवास, उल्लेखनीय यश, शैक्षणिक व वैद्यकीय सेवा, संशोधन कार्य, क्षमता बांधणीचे उपक्रम आणि इतर कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी समितीचे अध्यक्ष पी सी मोहन यांच्या हस्ते संस्थेच्या दोन महत्त्वपूर्ण प्रकाशनांचे प्रकाशन करण्यात आले — पहिले, 'क्रॉस डिसेबिलिटी अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर'ने विकसित केलेले 'ग्रोइंग टुगेदर' (Growing Together) हे मॉड्यूल, आणि दुसरे, 'डेव्हलपमेंट ऑफ कम्युनिकेशन लिंग्विस्टिक असेसमेंट प्रोटोकॉल इन बांगला फॉर राइट हेमिस्फेअर डिसऑर्डर्स' हे पुस्तक.

या दौऱ्याचा एक भाग म्हणून, शिष्टमंडळाने संस्थेच्या विविध प्रमुख विभागांना व सुविधांना प्रत्यक्ष भेट दिली आणि दिव्यांगजनांसाठी राबवल्या जाणाऱ्या सेवा व उपक्रमांची माहिती घेतली. तसेच, दर्जेदार निदान व पुनर्वसन सेवा उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या कटिबद्धतेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार करत, अध्यक्ष महोदयांच्या हस्ते नव्याने नूतनीकरण केलेल्या 'ऑडिओलॉजिकल विंग' चे उद्घाटन करण्यात आले.

देशभरातील दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसन, शिक्षण, संशोधन आणि सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी दिलेल्या भेटीबद्दल, मार्गदर्शनाबद्दल आणि सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल AYJNISHD(D) ने त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
राधिका अघोर/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2268695)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English