रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ओडिशामधील रामेश्वर ते पारादीप दरम्यान नवीन सागरी महामार्गाच्या (एकूण 163.180 किमी लांबीच्या दोन टप्प्यांतील सागरी महामार्गाचा भाग) हायब्रीड ॲन्युइटी मोडवरील बांधकामाला मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

प्रविष्टि तिथि: 03 JUN 2026 6:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज ओडिशामध्ये रामेश्वर ते पारादीप दरम्यान हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल (HAM) वर आधारित दोन टप्प्यांच्या पॅकेजेसद्वारे नवीन सागरी महामार्गाच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. या महामार्गाची एकूण लांबी 160.18 किमी असून भांडवली खर्च 8300.79 कोटी रुपये अपेक्षित आहे.

नव्या किनारी महामार्गाचा रामेश्वर ते पारादीप पर्यंतच्या प्रकल्पाचा भाग ओदिशाच्या खुर्दा, पुरी, केंद्रपाडा आणि जगतसिंगपूर या जिल्ह्यांमधून जात असून तो, राष्ट्रीय महामार्ग-क्रमांक 16 च्या विद्यमान रस्त्यांच्या सुवर्ण चतुष्कोण जाळ्याचा भाग आहे.

प्रस्तुत प्रकल्पांमध्ये ओडिशा राज्यातील खुर्दा, पुरी, केंद्रपाडा आणि जगतसिंगपूर या जिल्ह्यांमधून रामेश्वर ते कोणार्कपर्यंत जाणारा 4-पदरी मार्ग (पॅकेज-1) आणि कोणार्क ते पारादीपपर्यंत पक्क्या खांद्यासह दोन-पदरी (पॅकेज-2) रस्ता प्रस्तावित आहे, ज्यामुळे ताशी 100 किमीचा वेग गाठता येणे सुनिश्चित होईल आणि प्रवास सुधारेल.

Map of Corridor

Appendix - I: Project Details

Description

Rameshwar- Konark 4-Lane access-controlled Highway

Konark-Paradeep

2-lane with Paved Shoulder

Length (km)

79.40

80.78

Brownfield length (Km)

2.560

-

Greenfield Length (Km)

76.840

80.78

Total Civil Cost (Rs Cr.)

3129.06

1566.02

Land and other Pre-construction Cost (Rs Cr.)

751.62

668.13

Total Capital Cost (Rs Cr.)

5304.80

2995.99

Mode

Hybrid Annuity Model (HAM)

Hybrid Annuity Model (HAM)

Total Concession Period

17.5 years (2.5 years construction + 15 years O&M)

17.5 years (2.5 years construction + 15 years O&M)

Economic

2 SEZ- Bhubaneshwar, Khordha (Khandagiri); Mega Food Parks- Bhubaneshwar; Fishing Cluster-Paradeep, Konark, Jagatsinghpur, Puri, Kendrapada; Pharma Cluster- Cuttack.

Logistic Nodes

Puri Railway Station, Puri Airport, Astarang Port, Paradeep Port & MMLP -Jagatsinghpur.

Employment Generation Potential

53.61 Lakhs Man-Days (direct) & 67.01 lakh Man-Days (indirect)

Expected Annual Average Daily Traffic (AADT) during FY 2027-28

Pkg I : 10,437PCU (9,236 PCU Tollable)

Pkg II : 7,249PCU (6,369 PCU Tollable)

***

राधिका अघोर/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai Image result for facebook icon /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai

 

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2268554) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Malayalam