रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग 31 व 231 वरील खगडिया–पूर्णिया मार्गाचे चौपदरीकरण करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी; 143.529 किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी ₹3,936.05 कोटी खर्च अपेक्षित, प्रकल्पाची उभारणी बीओटी (टोल) तत्वावर
प्रविष्टि तिथि:
03 JUN 2026 5:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग 31 आणि 231 च्या खगडिया-पूर्णिया टप्प्याचे बीओटी (BOT - Toll) तत्त्वावर चौपदरीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. 143.529 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी 3,936.05 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग 31 आणि 231 च्या खगडिया-पूर्णिया टप्प्याच्या या प्रस्तावित रुंदीकरणामुळे रस्त्यांची दुरवस्था, धोकादायक वळणे आणि खगडिया, भागलपूर, कटिहार व पूर्णिया जिल्ह्यांतील निवासी क्षेत्रांमधील वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे. या मुख्य प्रकल्पाचाच एक भाग म्हणून पूर्णिया शहरासाठी 6.729 किलोमीटर लांबीचा एक विस्तारित बाह्यवळण रस्ता विकसित केला जाईल. या प्रकल्पामुळे वाहनांचा सरासरी वेग वाढेल, प्रवासाचा वेळ साधारण दोन तासांनी कमी होईल आणि एकंदरीत रस्ते सुरक्षा, इंधन बचत तसेच वाहनांचा देखभाल खर्च कमी होण्यास मदत होईल; ज्यामुळे पर्यायाने प्रादेशिक दळणवळण आणि सामाजिक-आर्थिक विकासाला गती मिळेल.

Appendix - I: Project Details
|
Feature
|
Details
|
|
Project Name
|
Upgradation of the Khagaria-Purnea Section of NH-31 and NH-231 to the 4-Lane Standard (143. 529 kms) in the State of Bihar on BOT (Toll) Mode
|
|
Corridor
|
Patna- Purnea
|
|
Length (km)
|
143.529
|
|
Total Civil Cost (Rs in Cr.)
|
2467.77
|
|
Land Acquisition Cost (Rs in Cr.)
|
290.16
|
|
Total Capital Cost (Rs in Cr.)
|
3936.05
|
|
Mode
|
BOT (Toll)
|
|
Bypasses
|
Greenfield Purnea Bypass of 6.729 Km length
|
|
Major Roads Connected
|
National Highways – NH-27, NH-13, NH-131A and NH-231
State Highways – SH-95 and SH-77
|
|
Economic / Social / Transport Nodes Connected
|
Airport: Purnea
Railway Stations: Khagaria, Bhagalpur, Katihar, Purnia
Economic Nodes: 01 Textile Cluster, 02 Mega Food Park, 02 Fishing Seafood Park
|
|
Major Cities / Towns Connected
|
Khagaria, Bhagalpur, Katihar, Purnia
|
|
Employment Generation Potential
|
32.59 lakhs person-days (direct) & 40.55 lakh person-days (indirect)
|
***
राधिका अघोर/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2268540)
आगंतुक पटल : 13