संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीआरडीओ आणि आयएएफ यांनी संयुक्तपणे, रुद्र एम- II या हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम क्षेपणास्त्राची विमानातून चाचणी केली यशस्वी

प्रविष्टि तिथि: 02 JUN 2026 8:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जून 2026

 

डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारतीय हवाई दलाने, रुद्र एम- II या हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम अशा, क्षेपणास्त्राची हवाई प्लॅटफॉर्म वरुन यशस्वी चाचणी केली. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत, या चाचण्या घेण्यात आल्या, ज्यातून, अत्यंत महत्वाच्या उड्डाण मार्गावर या क्षेपणास्त्राच्या सर्व उपप्रणालींच्या क्षमता सिद्ध झाल्या.  

ही क्षेपणास्त्र हवेत सोडल्यानंतर, एक पूर्वनिश्चित लक्ष्य अचूकतेने गाठण्यासाठी त्याला मार्गदर्शन करण्यात आले. चाचणीची सर्व उद्दिष्टे शंभर टक्के साध्य करण्यात आली, असे, या विमानाने संकलित केलेल्या डेटामधून स्पष्ट झाले. हा डेटा, चंडीपूरच्या एकात्मिक टेस्ट रेंजने लावलेल्या विविध उपकरणांवर संकलित करण्यात आला.

रुद्रम- 2 हे, हैदराबादच्या संपूर्ण स्वदेशी पद्धतीने, इमरात संशोधन केंद्रात, संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा, उच्च ऊर्जा उपकरण संशोधन प्रयोगशाळा, शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था अशा संस्थांच्या सहकार्याने विकसित करण्यात आले असून, डीआरडीओ त्याची नोडल संस्था आहे.  त्याशिवाय, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, रिजनल सेंटर फॉर मिलिटरी एअरवर्दीनेस, मिसाईल सिस्टिम क्वालिटी अशुरन्स एजन्सी आणि इतर आस्थापनांनी देखील हे उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाचे योगदान दिले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी उड्डाण चाचण्यांसाठी डीआरडीओ, हवाई दल, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, विकास-सह-उत्पादन भागीदार आणि उद्योग क्षेत्राच्या प्रयत्नांचे कौतुक केले. या चाचण्यांमुळे स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाची वाढती परिपक्वता सिद्ध झाली असून, प्रगत शस्त्रास्त्र प्रणालींमध्ये आत्मनिर्भर भारत अभियानाला मोठे बळ मिळाले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव तसेच डीआरडीओच्या अध्यक्षांनीही या चाचणीशी संबंधित सर्व चमूंचे या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

 

* * *

सुषमा काणे/राधिका अघोर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2268159) आगंतुक पटल : 118
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Odia , Tamil , Telugu