संरक्षण मंत्रालय
व्हाइस ॲडमिरल अजय कोचर, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एनएम, यांनी 48 वे नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला
Posted On:
29 MAY 2026 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मे 2026
व्हाईस ॲडमिरल अजय कोचर, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एनएम, यांनी 29 मे 2026 रोजी 48 वे नौदल उपप्रमुख (व्हीसीएनएस) म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताना या फ्लॅग ऑफिसरने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्रसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
पुण्यातील प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असणारे व्हाईस ॲडमिरल अजय कोचर 1 जुलै 1988 रोजी भारतीय नौदलात अधिकारी म्हणून रुजू झाले. तोफखाना आणि क्षेपणास्त्र प्रणालीचे तज्ञ म्हणून त्यांनी आपल्या 37 वर्षांहून अधिक काळाच्या गौरवशाली नौदल कारकिर्दीत विविध कमांड, परिचालन आणि स्टाफ पदांवर काम पाहिले आहे.
त्यांनी भारतीय नौदलाची जहाजे 'नाशक', 'विभूती' आणि 'कृपाण' यांचे नेतृत्व केले असून ते 'त्रिखंड' या फ्रिगेटचे कमिशनिंग कमांडिंग ऑफिसर होते. या फ्लॅग ऑफिसरने विमानवाहू जहाज 'आयएनएस विक्रमादित्य'चेही नेतृत्व केले आहे. त्यांच्या कार्यकाळात या विमानवाहू जहाजाने आपल्या हवाई विंगचे एकत्रीकरण आणि कार्यान्वयन यशस्वीरित्या पूर्ण केले.
वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, गोवा येथील नेव्हल वॉर कॉलेज आणि युनायटेड किंगडम येथील रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीजचे पदवीधर असलेल्या या फ्लॅग ऑफिसरने नौदल मुख्यालयात प्रमुख धोरणात्मक आणि धोरणाभिमुख स्टाफ पदांवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामध्ये नेव्हल प्लॅन्सचे सहसंचालक, स्टाफ रिक्वायरमेंट्सचे संचालक आणि डीएससीटीचे प्रधान संचालक या पदांचा समावेश आहे.
पश्चिम सागरी क्षेत्रातील आव्हानात्मक सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, फ्लॅग ऑफिसर यांनी 25 मे 2024 रोजी पश्चिम नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी पश्चिम सागरी किनाऱ्यावरील पारंपरिक आणि अपारंपरिक धोक्यांना तोंड देण्यासाठी कमांडच्या वतीने पुढाकार घेतला, ज्यामध्ये 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यानच्या वेगवान नौदल कारवायांचा समावेश होता. त्यांच्या अपवादात्मक नेतृत्वासाठी आणि अत्यंत उच्च दर्जाच्या गुणवंत सेवेसाठी त्यांना 2022 मध्ये 'अति विशिष्ट सेवा पदक' आणि 2026 मध्ये 'परम विशिष्ट सेवा पदक' प्रदान करण्यात आले.
नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ म्हणून काम पाहिले, जिथे त्यांनी ऑपरेशनल समन्वय आणि तिन्ही सेवांमध्ये एकीकरण व संयुक्तता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
(7)AMOC.jpeg)
(6)DXGO.jpeg)
(4)01HQ.jpeg)
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2266867)
अभ्यागत कक्ष : 9