अर्थ मंत्रालय
डीआरआयने पाटणा येथे कोडीन आधारित कफ सिरपच्या 7,500 बाटल्या जप्त केल्या; दोघांना अटक
Posted On:
28 MAY 2026 9:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मे 2026
अंमली पदार्थ विरोधी मोहिमेच्या अनुषंगाने, कोडीन आधारित कफ सिरपची मोठी खेप अवैधरित्या वळवण्याबाबत मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी दिनांक 26.05.2026 रोजी पाटणा येथील राजेंद्रनगर टर्मिनल रेल्वे स्थानकाच्या परिसराबाहेर एक टाटा इंट्रा पिकअप ट्रक अडवला आणि त्यातून कोडीन फॉस्फेट आणि ट्रायप्रोलिडाइन हायड्रोक्लोराइड सिरपच्या (ESkuf) 7,500 बाटल्या जप्त केल्या.
घटनास्थळावरून दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले, ज्यांनी या कोडीन-आधारित सिरपच्या पावत्यांसोबत एक कंसाइनमेंट नोट सादर केली. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पाठपुरावा/चौकशी केली, ज्यात उघड झाले की माल स्वीकारणाऱ्याचा (कन्सायनी) औषध परवाना रद्द करण्यात आला होता आणि दिलेल्या पत्त्यावर ती कंपनी अस्तित्वात नव्हती. कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, जप्त केलेले कफ सिरप आणि पिकअप वाहन ताब्यात घेण्यात आले आणि पकडलेल्या दोन व्यक्तींना एनडीपीएस कायदा, 1985 च्या संबंधित कलमांनुसार अटक करण्यात आली.
मादक पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांच्या सीमापार आणि देशांतर्गत तस्करीला आळा घालण्याबाबत डीआरआयच्या चालू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून अधिकाऱ्यांद्वारे ही कारवाई करण्यात आली. पुरवठा साखळी, आर्थिक संबंध आणि कंपन्या व व्यक्तींच्या सहभागाबाबत पुढील तपास सुरू आहे.
* * *
सोनाली काकडे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2266445)
अभ्यागत कक्ष : 7