युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते साई राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (एनसीओइ) गांधीनगर येथे एकात्मिक क्रीडा पायाभूत सुविधांचे उद्घाटन
Posted On:
24 MAY 2026 3:30PM by PIB Mumbai
गांधीनगर, 24 मे : केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज साई राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (एनसीओइ) गांधीनगर येथे अनेक नवीन क्रीडा पायाभूत सुविधांचे उद्घाटन केले. यामुळे देशभरात जागतिक दर्जाची उच्च-कार्यक्षमता क्रीडा परिसंस्था उभारण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला बळकटी मिळाली आहे.
मंत्र्यांनी या केंद्रात नव्याने विकसित करण्यात आलेल्या दिव्यांग खेळाडूंसाठी वसतिगृह, डायनिंग हॉल , शक्तिवर्धन आणि तंदुरुस्ती सभागृह, बहुउद्देशीय प्रशिक्षण सभागृह आणि मेडिटेशन पार्कचे उद्घाटन केले.

या सुविधा प्रशिक्षण, पुनर्बलन, पोषण, क्रीडा विज्ञान आणि मानसिक स्वास्थ्य यामधील एकात्मिक सहाय्याद्वारे खेळाडूंची तयारी अधिक सक्षम करण्यासाठी विकसित करण्यात आल्या आहेत.
खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांना संबोधित करताना डॉ. मांडविया म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या क्रीडा परिसंस्थेत आमूलाग्र परिवर्तन होत असून, खेळाडू केंद्रित विकास आणि सर्वसमावेशक क्रीडा पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला जात आहे.

भारताच्या जागतिक क्रीडा क्षेत्रातील प्रगतीवर प्रकाश टाकताना डॉ. मांडविया यांनी नमूद केले की, आशियाई दिव्यांग क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने 111 पदके जिंकली असून पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये विक्रमी 29 पदके मिळवली आहेत. यामुळे देशाची क्रीडा परिसंस्था वेगाने अधिक सक्षम होत असल्याचे दिसून येते.

ते म्हणाले, “अलीकडील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील आमची विक्रमी कामगिरी ही योगायोगाने मिळालेले यश नाही. ती खेळाडूंवरील सातत्यपूर्ण गुंतवणूक, वैज्ञानिक प्रशिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा आणि भारत जागतिक क्रीडा महासत्ता बनू शकतो या दृढ विश्वासाचे फलित आहे.”

मंत्र्यांनी निरीक्षण नोंदवले की, मंत्रालयाने दिव्यांग क्रीडा स्पर्धांसाठी मुख्य केंद्र म्हणून अधिसूचित केलेले साई एनसीओइ गांधीनगर हे दिव्यांग खेळाडूंच्या विकासासाठी देशातील आघाडीच्या उच्च कार्यक्षमता केंद्रांपैकी एक म्हणून उदयास येत आहे.

***
सुषमा काणे/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2264772)
अभ्यागत कक्ष : 18