युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रक्षा खडसे यांनी 'फिट इंडिया संडेज् ऑन सायकल'च्या 75 व्या विशेष आवृत्तीदरम्यान आयआयटी गुवाहाटी इथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 च्या समारंभाचे केले नेतृत्व

Posted On: 24 MAY 2026 2:26PM by PIB Mumbai



तंदुरुस्ती, युवा सहभाग आणि भारताच्या वाढत्या क्रीडा महत्त्वाकांक्षांचा एक प्रभावी उत्सव साजरा करत, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटी गुवाहाटी कॅम्पसमध्ये 'फिट इंडिया संडेज् ऑन सायकल'च्या विशेष राष्ट्रकुल क्रीडा आवृत्तीचे नेतृत्व केले.
उपस्थितांना संबोधित करताना रक्षा खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या 'फिट इंडिया' चळवळीच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि देशभरातील तंदुरुस्ती आणि क्रीडा सहभागाच्या वाढत्या संस्कृतीवर भर दिला.

भारत राष्ट्रकुल स्पर्धांचे यजमानपद भूषवणार आहे, म्हणूनच या खेळांचे स्वागत करण्यासाठी गुवाहाटीमध्ये 'संडेज् ऑन सायकल' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून दर रविवारी देशभरात 'संडेज् ऑन सायकल' हा उपक्रम राबवला जात आहे. 'फिट इंडिया' चळवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी सुरू केली होती, असे रक्षा खडसे म्हणाल्या.
आव्हानात्मक हवामान असूनही तरुण, खेळाडू आणि संस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाचे त्यांनी कौतुक केले आणि हा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल आयआयटी गुवाहाटी आणि साई (SAI) च्या चमूचे आभार मानले.

ऑलिम्पिकपटू आणि राष्ट्रकुल स्पर्धेतले  पदक विजेते जयंत तालुकदार आणि राष्ट्रकुल पदक विजेती सुशीला देवी लिकमाबम या महोत्सवात सहभागी झाले होते. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या आपल्या प्रवासातील अनुभवांद्वारे तरुण खेळाडूंना प्रेरित केले.

या वेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित एका विशेष प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते, त्या प्रदर्शनात खेलो इंडिया मिशन अंतर्गत झालेली प्रगती, क्रीडा पायाभूत सुविधांचा विस्तार आणि देशातील वाढती क्रीडा परिसंस्था यासह गेल्या 10 वर्षांतल्या भारताच्या क्रीडा क्षेत्रातल्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला. 'साई' (SAI) गुवाहाटीद्वारे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा मुक्त प्रश्नमंजुषा आणि चित्रकला स्पर्धेतल्या विजेत्यांचा रक्षा खडसे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमादरम्यान गौरव करण्यात आला.

***

सुषमा काणे/निखिलेश चित्रे

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2264752) अभ्यागत कक्ष : 18