पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी आपल्या मातृभूमीच्या पवित्र वारशाचे महत्त्व सांगणारे आणि जागतिक समृद्धीसाठी प्रार्थना करणारे संस्कृत सुभाषित केले शेअर

प्रविष्टि तिथि: 21 MAY 2026 9:04AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित शेअर केले. यात म्हटले आहे की, आपली मातृभूमी ही अध्यात्मिक साधना आणि उपासना, तसेच धैर्य, सामर्थ्य आणि वैश्विक कल्याणाची पवित्र भूमी राहिली आहे. महान वारसा आणि प्राचीन संस्कृती असलेली ही पवित्र भूमी सर्वांना सदैव सुख आणि समृद्धीने परिपूर्ण ठेवो, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांनी ‘एक्स’वर पोस्ट केले आहे:

“आपली मातृभूमी ही अध्यात्मिक साधना आणि उपासनेची, तसेच धैर्य, सामर्थ्य आणि वैश्विक कल्याणाची पवित्र भूमी राहिली आहे. महान वारसा आणि प्राचीन संस्कृतीची ही पावन धरती प्रत्येकाला नेहमी सुख-समृद्धीने परिपूर्ण ठेवो, हीच कामना आहे.

यस्यां पूर्वे पूर्वजना विचक्रिरे यस्यां देवा असुरानभ्यवर्तयन् ।

गवामश्वानां वयसश्च विष्ठा भगं वर्चः पृथिवी नो दधातु ।।"

ज्या भूमीवर आपल्या पूर्वजांनी महान आणि परोपकारी कृत्ये केली, आणि जिथे देवांनी अन्यायकारक शक्तींचा पराभव केला, ती पशुधन आणि सामर्थ्याने परिपूर्ण असलेली मातृभूमी, आपल्याला विशाल अवकाश आणि समृद्धी प्रदान करो.

***

NitinFulluke / RajshreeAgashe / DIneshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2263595) आगंतुक पटल : 60
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam