पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री मेजर जनरल भुवन चंद्र खांडूरी (सेवानिवृत्त) यांच्या निधनाबद्ल शोक व्यक्त केला
Posted On:
19 MAY 2026 3:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री मेजर जनरल भुवन चंद्र खांडूरी (सेवानिवृत्त) यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी म्हटले आहे की, मेजर जनरल खांडूरी यांनी सशस्त्र दलापासून ते राजकीय क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानासाठी ते कायम स्मरणात राहतील. खांडूरी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी उत्तराखंडच्या विकासासाठी केलेल्या योगदानाचा आणि निष्ठेचा उल्लेखही पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात केला. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ खरोखरच प्रेरणादायी असून त्यांनी देशभरातील संपर्क यंत्रणा सुधारण्यासाठी केलेल्या अथक परिश्रमाची प्रशंसाही त्यांनी आपल्या संदेशात केली आहे.
दुःखाच्या या काळात त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.
एक्स समाजमाध्यमावर लिहिलेल्या आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात.
"उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री मेजर जनरल भूवन चंद्र खांडूरी (सेवानिवृत्त) यांच्या निधनाने मला अतीव दुःख झाले आहे. सशस्त्र दलापासून ते राजकीय जीवनात त्यांनी बहूमूल्य योगदान दिले आहे. ज्यासाठी त्यांना सदैव स्मरणात ठेवले जाईल. उत्तराखंडच्या विकासासाठी ते नेहमीच समर्पित राहिले. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात हे स्पष्टपणे दिसून आले. केंद्रिय मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्यही सर्वांना प्रेरणा देणारे आहे. देशात संपर्क यंत्रणा अधिक चांगली व्हावी यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या बरोबर आहेत. ओम शांती!"
* * *
निलिमा चितळे/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2262780)
अभ्यागत कक्ष : 10