वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशात  एप्रिल 2026 दरम्यान वस्तू आणि सेवा यांची एकत्रित निर्यात 80.80 अब्ज डॉलर्स झाल्याचा अंदाज,  एप्रिल 2025 च्या 71.13 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीच्या तुलनेत ही वाढ 13.59 टक्के अधिक

Posted On: 15 MAY 2026 3:36PM by PIB Mumbai



एप्रिल 2026 * साठी भारताची एकूण निर्यात (वस्तू आणि सेवा एकत्रित) 80.80 अब्ज अमेरिकन डॉलर्स  इतकी झाली असल्याचा अंदाज आहे. एप्रिल 2025 च्या तुलनेत ही 13.59 टक्के सकारात्मक वाढ आहे. एप्रिल 2026* साठी एकूण आयात (वस्तू आणि सेवा एकत्रित) 88.61 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी अंदाजित आहे, ज्यामध्ये एप्रिल 2025 च्या तुलनेत 7.67 टक्के सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे.

वस्तू व्यापार

  • एप्रिल 2026 दरम्यान वस्तूंची निर्यात 43.56 अब्ज अमेरिकन डॉलर्स  इतकी होती; एप्रिल 2025 मधील 38.28 अब्ज अमेरिकन डॉलरच्या तुलनेत यामध्ये वाढ दिसून येते.
  • एप्रिल 2026 दरम्यान वस्तूंची आयात 71.94 अब्ज अमेरिकन डॉलर्स  इतकी होती; एप्रिल 2025 मधील 65.38 अब्ज अमेरिकन डॉलरच्या तुलनेत यामध्ये वाढ दिसून येते.  
  • एप्रिल 2026  मध्ये बिगर -पेट्रोलियम आणि रत्न व आभूषणे-व्यतिरिक्त वस्तूंची निर्यात 31.64 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती; एप्रिल 2025 मधील 28.66 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत यात वाढ दिसून येते.
  • एप्रिल 2026 मध्ये बिगर पेट्रोलियम आणि रत्न व आभूषणे-व्यतिरिक्त (सोने, चांदी आणि मौल्यवान धातू) वस्तूंची आयात 45.87 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती; एप्रिल 2025 मधील 39.75  अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत ही वाढ दर्शवते.


सेवा व्यापार

  • एप्रिल 2026* साठी सेवांच्या निर्यातीचे अंदाजित मूल्य 37.24 अब्ज अमेरिकन डॉलर इतके आहे; एप्रिल 2025 मध्ये  ते  32.85 अब्ज अमेरिकन डॉलर्स होते .
  • एप्रिल 2026* साठी सेवांच्या आयातीचे अंदाजित मूल्य 16.66 अब्ज अमेरिकन डॉलर असून ते एप्रिल 2025 मध्ये ते  16.91 अब्ज अमेरिकन डॉलर्स होते.
  • एप्रिल 2025 च्या तुलनेत एप्रिल 2026* दरम्यान सेवा निर्यातीत 13.36 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.
  • मूल्यातील बदलाच्या दृष्टीने पाहता, एप्रिल 2025 च्या तुलनेत एप्रिल 2026 मध्ये सकारात्मक वाढ दर्शवणारी शीर्ष 5 निर्यात स्थळे पुढीलप्रमाणे आहेत: सिंगापूर (179.18%), टांझानिया (157.63%), श्रीलंका (214.65%), बांगलादेश (64.16%) आणि हाँगकाँग (90.61%).
  • मूल्यातील बदलाच्या दृष्टीने पाहता, एप्रिल 2025 च्या तुलनेत एप्रिल 2026 मध्ये वाढ दर्शवणारे शीर्ष 5 आयात स्रोत पुढीलप्रमाणे आहेत: चीन (20.85%), रशिया (18.21%), ओमान (246.42%), पेरू (315.56%) आणि सौदी अरेबिया (30.29%).

***

सुषमा काणे/राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2261543) अभ्यागत कक्ष : 10