पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बिहारच्या मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


बिहारच्या जनतेने अगत्याने केलेले स्वागत आणि पाठिंबा यासाठी पंतप्रधानांनी मानले आभार

Posted On: 07 MAY 2026 8:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मे 2026

 

बिहार सरकारमधील मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बिहार राज्याच्या सर्वांगीण विकासाप्रती असलेली त्यांची वचनबद्धता राज्याला समृद्धीच्या नव्या उंचीवर नेईल असा आपल्याला विश्वास असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.  सशक्त बिहार आणि विकसित भारताच्या उभारणीचा संकल्प साकार करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आपल्या पटना  भेटीत बिहारच्या जनतेकडून मिळालेले प्रेम आणि आशीर्वादांबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञतादेखील व्यक्त केली आहे.

आपले ज्या आपुलकीने स्वागत झाले ते पाहून आपण भारावून गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच  लोकांनी दिलेला पाठिंबा आणि त्यांनी दाखविलेल्या उत्साहाबद्दल पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले. लोकांनी दाखविलेला हा अभूतपूर्व उत्साह, विकास आणि लोकसेवेप्रती असलेल्या सरकारच्या वचनबद्धतेला  जनतेच्या असलेल्या भक्कम पाठिंब्याचे प्रतिंबिब असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

पंतप्रधान एक्स समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हणतात;

“बिहारच्या एनडीए सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या सर्व सोबत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा! मला पूर्ण खात्री आहे की राज्याच्या सर्वांगीण विकासाबद्दलची तुमची वचनबद्धता आपल्या या राज्याला समृद्धीच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल. चला, आपण सर्वांनी मिळून सशक्त बिहार आणि विकसित भारताची निर्मिती करण्याचा संकल्प साकार करूया.”

 

“पटना येथे बिहारच्या माझ्या परिवारातील सदस्यांकडून मिळालेले प्रेम आणि त्यांच्या आशीर्वादामुळे मी भारावून गेलो आहे. या स्वागतासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. हा अभूतपूर्व उत्साह, विकास आणि जनसेवेच्या आमच्या संकल्पाला जनता-जनार्दनाचा भरभरून पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्टपणे दर्शवतो.”

 

* * *

सोनाली काकडे/मंजिरी गानू/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2258866) अभ्यागत कक्ष : 9