दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया 8 आणि 9 मे रोजी मुंबई आणि पुण्याला भेट देणार


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री सिंधिया मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानक उप टपाल कार्यालयाचे उद्घाटन करणार

पुण्यात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला तसेच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार

Posted On: 07 MAY 2026 7:46PM by PIB Mumbai

मुंबई, 7 मे 2026

 

केंद्रीय दूरसंचार आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री, ज्योतिरादित्य एम. सिंधिया, 8 आणि 9 मे 2026 रोजी महाराष्ट्राच्या अधिकृत दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात टपाल विभागाशी संबंधित महत्त्वाच्या कामांचा तसेच मुंबई आणि पुण्यातील प्रमुख शैक्षणिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमधील सहभागाचा समावेश असेल.

8 मे, 2026 रोजी, केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानक उप टपाल कार्यालयाचे उद्घाटन करतील. हा उपक्रम नागरिक-केंद्रित टपाल पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या आणि जास्त वर्दळ असलेल्या शहरी केंद्रांमध्ये सेवांची उपलब्धता वाढवण्याबाबत टपाल विभागाचे सातत्यपूर्ण प्रयत्न प्रतीत करतो.

मंत्री सिंधिया 9 मे, 2026 रोजी, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी पुण्याला रवाना होतील. या कार्यक्रमात पदवीधर विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतील प्रतिष्ठित पाहुणे एकत्र येतील. त्यानंतर संध्याकाळी, ते पुण्यात पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहतील. हा सोहळा शहरातील प्रमुख सार्वजनिक कार्यक्रमांपैकी एक असून या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट योगदानाबद्दल प्रतिष्ठित व्यक्तींचा सन्मान केला जातो.

हा दौरा सार्वजनिक सेवा वितरण मजबूत करणे, शैक्षणिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय तसेच प्रादेशिक महत्त्वाच्या संस्थांशी संलग्न होण्याबाबत सरकारचे सातत्यपूर्ण प्रयत्न अधोरेखित करतो.

 

* * *

पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/संदेश नाईक/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2258854) अभ्यागत कक्ष : 24