संरक्षण मंत्रालय
सैनिकांच्या अतुलनीय शौर्याने ऑपरेशन सिंदूर भारताच्या लष्करी इतिहासात एक सुवर्ण अध्याय म्हणून गणला जाईल: शौर्य समारंभात संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन
Posted On:
02 MAY 2026 9:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2026
अतुलनीय शौर्याने आणि दृढनिश्चयाने 'ऑपरेशन सिंदूर'ला भारताच्या लष्करी इतिहासात एक सुवर्ण अध्याय म्हणून अधोरेखित केले गेले आहे,अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय संरक्षण दलांच्या कामगिरीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. निर्णायक कारवाईद्वारे दहशतवाद समूळ नष्ट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दृढ निश्चयावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने 2 मे 2026 रोजी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या 'शौर्य' या कार्यक्रमात ते बोलत होते.
संरक्षणमंत्र्यांनी जवानांच्या शौर्य, समर्पण आणि देशभक्तीची प्रशंसा केली आणि ते म्हणाले की, 'राष्ट्र प्रथम आणि स्वार्थापेक्षा सेवा' या त्यांच्या मूल्यांनी प्राचीन काळापासून ते 'ऑपरेशन सिंदूर' सारख्या समकालीन मोहिमांपर्यंत भारताच्या लष्करी परंपरांना आकार दिला आहे. संरक्षण दलांचे शौर्य केवळ रणांगणापुरते मर्यादित नाही, तर ते देशांतर्गत आणि परदेशात नैसर्गिक आपत्तींच्या वेळी प्रथम प्रतिसाद देत मानवतावादी मदत देखील पुरवतात असे ही त्यांनी पुढे नमूद केले. ”आपले सैनिक आपल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी शस्त्रांचा वापर करतात पण संकटाच्या काळात गरजूंपर्यंत अन्न आणि औषधे पोहोचवतात; हेच आपल्या संरक्षण दलांचे वैशिष्ट्य आहे,” असे ते पुढे म्हणाले.
हा समारंभ कला आणि शौर्याचा एक अनोखा संगम होता, ज्याला संरक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, शेकडो कर्मचारी, पद्मश्री पुरस्कार विजेते अनुप जलोटा, कैलाश खेर, हर्षदीप कौर आणि मनोज मुंतशीर यांसारखे नामवंत कलाकार उपस्थित होते. शौर्य आणि कला यांना अनेकदा परस्परविरोधी मानले जाते, परंतु प्रत्यक्षात त्या एकमेकांना पूरक आहेत, असे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले. या दोन्हींचे वर्णन मानवी भावनांमधून प्रकट होणारी शक्तिशाली अभिव्यक्ती असे त्यांनी केले.
संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केले की, लष्करी बँडची संचलन गीते सैनिकांमध्ये एकजुटीची भावना निर्माण करतात आणि संगीत वैयक्तिक ओळखीचे रूपांतर सामूहिक शक्तीमध्ये करते. ही भावना संरक्षण दलांच्या नीतिमत्तेत खोलवर रुजलेली आहे, असे ही ते पुढे म्हणाले.
संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग आणि लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
* * *
शैलेश पाटील/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2257593)
अभ्यागत कक्ष : 11