वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत–टांझानिया संयुक्त व्यापार समितीची 5 वी बैठक दार-ए-सलाम येथे संपन्न; द्विपक्षीय आर्थिक सहकार्याला चालना

Posted On: 01 MAY 2026 3:19PM by PIB Mumbai

भारत–टांझानिया संयुक्त व्यापार समितीची (जेटीसी) 5 वी बैठक 29–30 एप्रिल 2026 रोजी टांझानियातील दार-ए-सलाम येथे आयोजित करण्यात आली.

या बैठकीचे सह-अध्यक्षस्थान भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल आणि टांझानिया प्रजासत्ताकाच्या परराष्ट्र व पूर्व आफ्रिका सहकार्य मंत्रालयाचे स्थायी सचिव राजदूत डॉ. सॅमवेल विल्यम शेलुकिंडो यांनी भूषवले.

ऑगस्ट 2017 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या चौथ्या बैठकीनंतर झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांनी आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली.

चर्चा मैत्रीपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात पार पडली, ज्यातून भारत आणि टांझानिया यांच्यातील दृढ संबंध स्पष्ट झाले. व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित मुद्द्यांवर संवाद साधण्यासाठी आणि परस्पर हिताच्या आर्थिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी जेटीसी ही महत्त्वाची संस्थात्मक यंत्रणा असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.

द्विपक्षीय व्यापाराचा आढावा घेताना त्यात सातत्यपूर्ण वाढ नोंदविण्यात आली. 2025–26 मध्ये द्विपक्षीय व्यापार 9.02 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचला असून 2024–25 मध्ये तो 8.64 अब्ज अमेरिकी डॉलर होता.

स्थानिक चलनांमध्ये व्यापार व्यवहार, भारतीय व्यावसायिकांसाठी दीर्घकालीन व्यवसाय व्हिसा सुलभता, औषधनिर्माण क्षेत्रातील नियामक सहकार्य आणि आरोग्य, आयुष, शिक्षण तसेच जहाजबांधणी क्षेत्रातील क्षमता विकास यांवर चर्चा झाली.

खनिज क्षेत्रातील सहकार्य, भूवैज्ञानिक शोध, खाणकाम, रत्नप्रक्रिया उद्योगातील मूल्यवर्धन, रत्न निर्यातीसंबंधी नियामक सुधारणा तसेच कौशल्य विकासाच्या संधी यांवरही विचारविनिमय करण्यात आला.

शिक्षण आणि कौशल्य विकास हे सहकार्याचे महत्त्वाचे क्षेत्र राहिले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी उदयोन्मुख प्रादेशिक केंद्र म्हणून आयआयटी मद्रास झांजिबारच्या भूमिकेवर विशेष भर देण्यात आला. एमएसएमई क्षेत्रातील सहकार्य वाढविणे आणि नवीन संस्थात्मक भागीदारी निर्माण करण्यावरही चर्चा झाली.

व्यावसायिक प्रशिक्षण, औद्योगिक संशोधन, नवकल्पना आणि शाश्वत तंत्रज्ञान ही भविष्यातील सहकार्यासाठी आशादायी क्षेत्रे असल्याचे नमूद करण्यात आले.

डिजिटल सहकार्याशी संबंधित विद्यमान सामंजस्य कराराचा आढावा घेण्यात आला. इंडिया स्टॅकसह डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, रिअल-टाइम पेमेंट्स, डिजिलॉकर आणि डिजिटल सेवांमधील सहकार्याच्या संधींचा विचार करण्यात आला. ई-कॉमर्स क्षेत्रातील सहकार्य, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण आणि नियामक आव्हानांवरही चर्चा झाली.

भारत–टांझानिया संयुक्त व्यापार समितीची पुढील (6 वी) बैठक परस्पर सोयीच्या तारखांना नवी दिल्ली येथे आयोजित करण्याचे या दरम्यान ठरवण्यात आले.

***

शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

(Release ID: 2257403) अभ्यागत कक्ष : 10