पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी लोकप्रतिनिधीचा यथार्थ संकल्प विशद करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक

Posted On: 29 APR 2026 8:41AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रतिनिधीचा यथार्थ संकल्प विशद करणारे संस्कृत सुभाषित आज सामायिक केले आहे. 
देशाचे सजग नागरिक म्हणून आपली लोकशाही अधिक सशक्त करण्यासाठी विक्रमी मतदान सुनिश्चित करणे, हे आपले कर्तव्य असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 
 
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे : 
''देशाचे सजग नागरिक म्हणून आपली लोकशाही अधिक सशक्त करण्यासाठी विक्रमी मतदान सुनिश्चित करणे, हे आपले कर्तव्य आहे. अशा प्रकारे भारताच्या नवनिर्माणात आपण आपली सक्रिय भागीदारी निभावू शकतो, त्याचसोबत एका समर्थ आणि समृद्ध राष्ट्राचा पाया आणखी भक्कम करू शकतो. 

राज्ञो हि व्रतमुत्थानं यज्ञः कार्यानुशासनम्।

दक्षिणा वृत्तिसाम्यं च दीक्षितस्याभिषेचनम्॥"

लोककल्याणाच्या दृष्टिकोनातून, लोकांचा सातत्याने उत्कर्ष साधणे, पवित्र उत्तरदायित्व समजून कर्तव्यांचे निष्ठापूर्वक पालन करणे, न्याय्य निर्णयाची सुनिश्चिती, मुक्तहस्ते दान, प्रत्येकासोबत समतापूर्ण वर्तन आणि  पवित्र वृत्तीने स्वतःला शुद्ध, शिस्तबद्ध व समर्पित ठेवणे,  हाच एका लोकप्रतिनिधीचा खरा संकल्प होय.

***

NehaKulkarni / SonaliKakde / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2256531) अभ्यागत कक्ष : 7