युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

समावेशक आणि विकसित भारताच्या उभारणीमध्ये नारी शक्तीची भूमिका केंद्रस्थानी आहे: राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे

Posted On: 13 APR 2026 10:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 एप्रिल 2026

 

केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या, मेरा युवा भारत (माय भारत) द्वारे दिल्ली विद्यापीठातील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स (एसआरसीसी) येथे राष्ट्रीय स्तरावरील माय भारत बजेट क्वेस्ट 2026 चे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले.

समारोप सत्राला संबोधित करताना, युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी नारी शक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. समावेशक, सहभागात्मक आणि भविष्यासाठी सज्ज लोकशाही निर्माण करण्यासाठी महिला सक्षमीकरण हा मूलभूत घटक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आपल्या वैयक्तिक प्रवासाचा दाखल देत, त्यांनी लवचिकता, नेतृत्व आणि राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत महिला आणि तरुणांच्या अधिकाधिक सहभागाच्या गरजेवर भर दिला.

माय भारत सारखे मंच युवकांचा सुनियोजित सहभाग वाढवण्यात, तसेच आर्थिक आणि धोरणात्मक मुद्द्यांविषयी जागृती निर्माण करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात, असे त्यांनी नमूद केले. युवा नागरिकांमध्ये माहितीपूर्ण संवाद आणि विश्लेषणात्मक विचारांना चालना दिल्याबद्दल त्यांनी 'बजेट क्वेस्ट' उपक्रमाची प्रशंसा केली.

   

या कार्यक्रमात दोन संकल्पनांवर आधारित चर्चासत्रे झाली. कौशल्य विकास आणि रोजगार आणि भविष्यातील अर्थव्यवस्थेत मानवी गुंतवणूक- डिजिटल तंत्रज्ञान आणि नवोन्मेषावर आधारित अर्थव्यवस्था. या चर्चासत्राने भारताच्या विकासाच्या वाटचालीतील महत्त्वाच्या पैलूंवर विचारमंथन करण्यासाठी, नामवंत शिक्षणतज्ज्ञ आणि तज्ज्ञांना एकत्र आणले.

त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात, तरुणांना कल्पना सामायिक करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासात योगदान देण्यासाठी सक्षम करणारे व्यासपीठ म्हणून, माय भारत बजेट क्वेस्ट 2026 चे महत्त्व अधोरेखित केले. भारताचे भविष्य घडवण्यासाठी आणि समावेशक विकासाला चालना देण्यासाठी युवा प्रतिभा महत्वाची आहे, यावर त्यांनी भर दिला. हा उपक्रम शिक्षण, कौशल्ये, रोजगार आणि नवोन्मेष, यावर लक्ष केंद्रित करून धोरण निर्मितीमध्ये सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देतो, असे त्यांनी नमूद केले.

 

* * *

सुषमा काणे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2251720) अभ्यागत कक्ष : 12
Read this releasein: English , हिन्दी