युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी स्वतः सायकल चालवत केले फिट इंडिया संडे या मोहीमेच्या 69 व्या आवृत्तीचे नेतृत्व


विकसित राष्ट्र उभारण्यासाठी फिट इंडिया चळवळीत लोकसहभाग वाढवण्याचे मनसुख मांडविया यांचे आवाहन

Posted On: 12 APR 2026 12:47PM by PIB Mumbai


नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम इथे आज फिट इंडिया संडे या मोहीमेच्या 69 व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी स्वतः सायकल चालवत या मोहीमेचे नेतृत्व केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित  केले. राष्ट्र उभारणीत शारीरिक सुदृढतेची भूमिका महत्त्वाची असल्याची बाब त्यांनी अधोरेखीत केली. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांना फिट इंडिया चळवळीत सहभागी व्हावे तसेच, क्रियाशील जीवनशैलीचा अवलंब करावा असे आवाहनही त्यांनी.

जर भारताला विकसित राष्ट्र बनायचे असेल, तर आपल्या नागरिकांची, विशेषतः युवा वर्गाची सुदृढता हा त्याचा पाया आहे अशा शब्दांत त्यांनी शारीरिक सुदृढतेचे महत्त्वही अधोरेखीत केले.

यावेळी मांडविया यांनी फिट इंडिया ॲपच्या माध्यमातून शारीरिक सुदृढतासोबत शाश्वततेचे एकात्मिकरण घडवून आणता येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. याअंतर्गत नागरिकांना सायकल चालवून कार्बन क्रेडिट्स मिळवता येतील असे त्यांनी सांगितले. वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक पर्यायांच्या वापराला चालना देण्यासोबतच आरोग्यदायी जीवनशैलीचा पुरस्कार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला असल्याचे ते म्हणाले. या उपक्रमाअंतर्गत संकलित झालेले कार्बन क्रेडिट उत्पादनांच्या खरेदीसाठी वापरता येणार असल्याचे तसेच, लवकरच सायकलिंग अंतर्गतच्या लीडर बोर्ड मधील विजेत्यांना भेटवस्तू स्वरुपात प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आजच्या या उपक्रमानिमीत्त 2014 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती मुष्टीयोद्धा पिंकी जांग्रा हिचा गौरवही करण्यात आला. यासोबतच मुए थाई मार्शल आर्टिस्ट आणि इंडियाज अल्टिमेट वॉरियरचा विजेता दिनेश शेट्टी, यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या सोनिया सिसोदिया या फिटनेस इन्फ्लुएन्सर्सनाही यावेळी सन्मानीत केले गेले.

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी डिसेंबर 2024 मध्ये फिट इंडिया संडे ऑन सायकलचे या उपक्रमाचा प्रारंभ केला होता. आज हा उपक्रम एका प्रभावशाली लोकचळवळीत रुपांतरीत झाला आहे. डिसेंबर 2024 पासून आतापर्यंत देशभरातील 2.63 लाखांपेक्षा जास्त ठिकाणी आयोजित केलेल्या या उपक्रमाअंतर्गत एकूण 28 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे.

***

सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2251270) अभ्यागत कक्ष : 30