संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते लखनौ छावणीतील स्मृतिका युद्ध स्मारक येथे अत्याधुनिक लेझर, लाईट आणि साऊंड शोचे उद्घाटन
Posted On:
11 APR 2026 8:18PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 11, एप्रिल 2026 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ छावणीतील स्मृतिका युद्ध स्मारक येथे एका अत्याधुनिक लेझर, लाईट आणि साऊंड शोचे उद्घाटन केले. सुमारे 30 मिनिटांच्या या हिंदीमधील मल्टीमीडिया शोमध्ये, प्रगत प्रोजेक्शन, ध्वनी आणि प्रकाश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय लष्कराचा इतिहास, परिचालन उपलब्धी आणि राष्ट्र उभारणीतील योगदानाची माहिती देण्यात आली. हा शो स्मृतिका युद्ध स्मारक येथे दररोज संध्याकाळी आयोजित केला जाईल आणि लवकरच तो जनतेसाठी खुला केला जाईल.

या मल्टीमीडिया सादरीकरणात भारताच्या प्रमुख युद्धांचा आढावा देण्यात आला असून विशेषतः 1947-48, 1962, 1965 आणि 1971 च्या युद्धांमधील प्रमुख परिचालन बाबी तसेच ऑपरेशन मेघदूत आणि ऑपरेशन विजय दरम्यानचे अतुलनीय योगदान अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमात विविध मोहिमांमधील मध्यवर्ती कमांडची महत्त्वपूर्ण भूमिका ठळकपणे दाखवण्यात आली. याव्यतिरिक्त, अवध प्रदेशातील परमवीर चक्र मानकऱ्यांचे अतुलनीय शौर्य देखील अधोरेखित करण्यात आले. तसेच अवधच्या खोलवर रुजलेल्या लढाऊ परंपरा आणि राष्ट्राच्या संरक्षणातील त्याच्या उल्लेखनीय योगदानाचा संक्षिप्त आढावाही सादर करण्यात आला.

नवीन उद्भवणारे धोके आणि युद्धाच्या बदलत्या स्वरूपाला प्रतिसाद म्हणून भारतीय लष्कराचे करण्यात आलेले सातत्यपूर्ण आधुनिकीकरण आणि परिवर्तन यांचाही या शो मध्ये समावेश होता. भारतीय संरक्षण उद्योगातील अलिकडच्या प्रगतीवर विशेष भर देण्यात आला. ज्याचा वापर प्रथमच 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करण्यात आला होता. तसेच, 'आत्मनिर्भरता' उपक्रमांचे केंद्र म्हणून उत्तर प्रदेशचा झालेला उदय , ज्याचे ठळक उदाहरण म्हणजे राज्याचा संरक्षण कॉरिडॉर आहे.
***
राधिका अघोर/सुषमा काणे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2251205)
अभ्यागत कक्ष : 11