PIB Headquarters
वुमनिया: महिला उद्योजकांसाठी समावेशक बाजारपेठेची उभारणी
Posted On:
10 APR 2026 10:47AM by PIB Mumbai
· वुमनिया (Womaniya) उपक्रमामुळे महिला उद्योजक आणि बचत गटांना GeM व्यासपीठाच्या माध्यमातून सरकारी खरेदीदारांना थेट विक्री करता येते.
· यामध्ये हस्तकला, हातमाग, ताग, काथ्या, गृहसजावट आणि कार्यालयीन सजावटीच्या वस्तू यांसारख्या निर्धारित श्रेणींमधील वस्तू खरेदीसाठी उपलब्ध केल्या जातात.
· GeM वर 2.1 लाखांहून अधिक महिलांनी नोंदणी केली असून आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये त्यांनी 13.7 लाख ऑर्डर्स मिळवल्या.
परिचय: वुमनिया-प्रत्येक महिलेसाठी संधीचे दार उघडणारा उपक्रम
सार्वजनिक खरेदी ही भारतातील एक प्रमुख संघटित बाजारपेठ आहे. GeM द्वारे डिजिटल खरेदीचा विस्तार झाल्यामुळे, ही प्रणाली अधिक पारदर्शक, प्रमाणित आणि पुरवठादारांच्या व्यापक गटासाठी उपलब्ध झाली. महिलांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म आणि लघु उद्योग, तसेच बचत गटांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 2019 मध्ये जीईएमवर ‘वुमनिया’ हा उपक्रम सुरू केला. डिजिटल माध्यम उपलब्ध करून, बाजारपेठ प्रवेशासाठी आवश्यक बाबी सुलभ करून, महिला-उद्योजक आणि बचत गटांना सरकारी खरेदीदारांशी संपर्क साधण्यासाठी सुव्यवस्थित मार्ग तयार करून, सार्वजनिक खरेदीमध्ये महिला उद्योजकांचा समावेश अधिक बळकट करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
GeM
गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (GeM) हे एक ऑनलाइन व्यासपीठ असून, ते विविध केंद्रीय आणि राज्य मंत्रालये, विभाग, संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पंचायती आणि सहकारी संस्थांना वस्तू आणि सेवांच्या संपूर्ण खरेदी प्रक्रियेचे सुलभतेने व्यवस्थापन करायला सहाय्य करते. "किमान सरकार, कमाल प्रशासन" या दृष्टीकोनांतर्गत 2016 मध्ये सुरू करण्यात आलेले हे एक कागद-रहित, रोख-रहित आणि संपर्क-रहित व्यासपीठ असून, याद्वारे सरकारी खरेदीदारांना संपूर्ण भारतातील विक्रेत्यांकडून वस्तू आणि सेवांची थेट ऑनलाइन खरेदी करता येते.
अधिक माहितीसाठी येथे भेट द्या: https://gem.gov.in/

वुमनिया उपक्रम: महिला उद्योजकांसाठी एक समर्पित व्यासपीठ
वुमनिया हा जीईएमवरील एक समावेशकतेवर भर देणारा उपक्रम आहे, जो औपचारिक सरकारी बाजारपेठेतील महिलांच्या प्रवेशावरील मर्यादा दूर करायला सहाय्य करतो. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया अंतर्गत, एक समर्पित डिजिटल इंटरफेस उपलब्ध करण्यात आला असून, याद्वारे, महिला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि बचत गट, त्यांची हातमाग, ताग, काथ्या आणि गृहसजावटीच्या वस्तू इत्यादी उत्पादने नोंदणी करून सूचीबद्ध करू शकतात, केंद्रीय मंत्रालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना भारतात कोठेही थेट खरेदी करता येते.
आपल्याला माहित आहे का?
बचत गट, या तळागाळातील अनौपचारिक संस्था असून, ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. बचत गटांमध्ये सामान्यत: 10 ते 20 सदस्य असतात, ते आपली संसाधने एकत्र आणतात. एकत्र काम करून बचत करतात, एकमेकांना मदतीचा हात देतात आणि उत्पन्न-निर्मिती करणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होतात.
फेब्रुवारी 2026 पर्यंत, 10.05 कोटी महिला 90.09 लाख बचत गटांच्या माध्यमातून एकत्र आल्या, यामुळे आर्थिक समावेशन आणि सामूहिक आर्थिक कृतीचा विस्तार झाला.
हा उपक्रम महिला उद्योजकांचे बाजारपेठेतील अस्तित्व वाढवतो, खरेदीदार-विक्रेता संवाद सुलभ करतो, आणि मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी करून, त्यांना पाठबळ देतो. तसेच तो सरकारच्या व्यापक समावेशकतेच्या प्राधान्यक्रमांशी सुसंगत असून, पुढील राष्ट्रीय उद्दिष्टांना समर्थन देतो:
· पुरवठादारांची विविधता वाढवणे.
· महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योजकतेला बळकटी देणे.
· कमी प्रतिनिधित्व असलेल्या गटांना संघटित खरेदीच्या प्रवाहात समाविष्ट करणे.
स्वायत्त (SWAYATT)
स्वायत्त (ई-व्यवहारांद्वारे स्टार्टअप्स, महिला आणि तरुणांना लाभ), हा 'गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस'चा (GeM) एक उपक्रम असून, तो सार्वजनिक खरेदीमध्ये समावेशक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आला. हा उपक्रम स्टार्ट-अप्स, महिला उद्योजक, युवक, सूक्ष्म आणि लघु उद्योग, बचत गट, आणि वंचित समुदायांना सरकारी बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवून देण्यावर लक्ष केंद्रीत करतो. GeM व्यासपीठावर या गटांसाठी प्रवेशाशी संबंधित अडथळे दूर करणे आणि व्यवसाय सुलभता वाढवणे, हे 'SWAYATT' चे उद्दिष्ट आहे.
वुमनिया हा उपक्रम 'SWAYATT' कार्यक्रमांतर्गत व्यापक समावेशकतेच्या उद्दिष्टाला पूरक आहे.
वुमनिया अंतर्गत उत्पादन श्रेणी
वुमनिया अशा उत्पादन-विभागांचे गट करते, जिथे महिला-नेतृत्वाखालील उद्योग आणि बचत गटांकडे आधीपासूनच मजबूत उत्पादन क्षमता आहे. या श्रेणींची या उपक्रमांतर्गत औपचारिकपणे निवड केली जाते आणि GeM वरील निवडक स्टोअरफ्रंट्सद्वारे सरकारी खरेदीदारांसाठी शोधण्यायोग्य बनवले जाते. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
- वुमनिया हस्तकला
- वुमनिया किराणा आणि पॅंट्री
- वुमनिया ऑफिस ॲक्सेसरीज
- वुमनिया हातमाग कापड
- वुमनिया वैयक्तिक स्वच्छता आणि काळजी
या वस्तूंना एकात्मिक श्रेणी चौकटीत सूचीबद्ध केल्याने GeM उत्पादने अधिक सहजपणे शोधता येतात आणि विभागांना महिला-नेतृत्वाखालील उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी करणे सोपे होते.

वुमनिया उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये
हा उपक्रम महिला-नेतृत्वाखालील उद्योग आणि बचत गटांसाठी नवीन मार्ग खुले करण्यासाठी GeM वरील विशेष प्लॅटफॉर्म वैशिष्ट्यांचा उपयोग करतो. यामुळे त्यांना शासकीय बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवणे, आपली उत्पादने प्रदर्शित करणे आणि एका पारदर्शक व सहाय्यक डिजिटल परिसंस्थेमध्ये आपला व्यवसाय सातत्याने वाढवणे शक्य होते.

महिला उद्योजक आणि बचत गटांचे डिजिटल ऑनबोर्डिंग
उद्यम पडताळणी आणि आवश्यक कागदपत्रांचा वापर करून, एका डिजिटल प्रक्रियेद्वारे महिलांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म आणि लघु उद्योगांचे ऑनबोर्डिंग केले जाते. GeM द्वारे ऑफलाइन आणि ऑनलाइन प्रशिक्षण कार्यशाळांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या सखोल ऑनबोर्डिंग सत्रांद्वारे महिला सूक्ष्म आणि लघु उद्योगांचे संघटन आणि क्षमता बांधणी अधिक मजबूत केली जाते.
मानकीकृत कॅटलॉग सूचीकरण
परिभाषित तांत्रिक वैशिष्ट्ये आणि गुणधर्म असलेल्या एकसमान कॅटलॉग टेम्पलेट्सचा वापर करून उत्पादने सूचीबद्ध केली जातात, यामुळे विक्रेत्यांमध्ये तुलनात्मकता सुनिश्चित होते आणि खरेदीदाराचे मूल्यांकन सोपे होते.
पारदर्शक आणि पूर्णपणे डिजिटल खरेदी प्रक्रिया
निविदा, मागणी नोंदवणे, स्वीकृती, बीजक आणि देयके इत्यादींसह सर्व खरेदी संबंधित कार्यवाही डिजिटल पद्धतीने पार पाडली जाते. यामुळे मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी होते आणि महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योग व सरकारी खरेदीदार यांच्यात थेट संवाद साधला जातो.
कालबद्ध स्वीकृती आणि देयक यंत्रणा
डिजिटाइज्ड कार्यप्रणालीमुळे वेळेवर देयके मिळण्यास मदत होते, जो मर्यादित खेळत्या भांडवलावर कार्यरत असलेल्या सूक्ष्म आणि लहान पुरवठादारांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार आहे.
प्रशिक्षण, संपर्क आणि सहाय्य सेवा
'स्वायत्त' आणि 'वुमनिया' या विशेष कार्यक्रमांतर्गत, GeM देशभरातील विविध राज्यांमध्ये 'ऑनबोर्डिंग' कार्यशाळा, स्थानिक भाषेतील प्रशिक्षण आणि खरेदीदार-विक्रेता मेळावे यांसारखे क्षमता-बांधणी उपक्रम राबवते.
सहभागापासून समृद्धीपर्यंत: वुमनियाचा प्रभाव
“वुमनिया ऑन जीईएम” ची अंमलबजावणी हे लिंगभाव समावेशक खरेदी पोर्टलच्या दिशेने एक पाऊल आहे.
शासकीय खरेदीदार 'वुमनिया' यादीत असलेल्या उत्पादनांसाठी मागणी नोंदवतात आणि महिला उत्पादकांना खरेदी प्रक्रियेत समाविष्ट करतात.
तळागाळाच्या स्तरावर जिल्हा प्रशासन, उद्योजकता सहाय्यता केंद्रे आणि प्रशिक्षण संस्था विक्रेत्यांची सज्जता वाढवण्यासाठी ऑनबोर्डिंग मोहीम, प्रशिक्षण कार्यक्रम आणि उत्पादन कॅटलॉग कार्यशाळा आयोजित करतात.
विशेष म्हणजे, वुमनिया उपक्रमाचा प्रारंभ झाल्यापासूनच लक्षणीय विस्तार झाला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये:
- GeM वर 2.1 लाखांहून अधिक महिला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी झाली असून, एकूण ऑर्डरची संख्या 13.7 लाख आहे.
- महिला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना 28,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याची कंत्राटे देण्यात आली असून, ही वाढ मागील वर्षाच्या तुलनेत 27.60% आहे.
- GeM च्या एकूण ऑर्डरपैकी 5.6% ऑर्डर मंजूर झाल्या असून, हे प्रमाण निर्धारित 3% खरेदीच्या उद्दिष्टापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे.

हा उपक्रम एका विशेष समावेशन प्रयत्नातून विकसित होऊन देशातील महिला-नेतृत्वाखालील उद्योगांसाठी सर्वात मोठ्या संघटित सार्वजनिक खरेदी प्रणालींपैकी एक बनला आहे.
डिजिटल पायाभूत सुविधा, क्षेत्रीय स्तरावरील संघटन, क्षमता बांधणी आणि संस्थात्मक मागणी यांच्या परस्परसंबंधित भूमिका एक असे सहयोगी पोषक वातावरण एकत्रितपणे निर्माण करतात, जे महिलांच्या आर्थिक सहभागास मोठ्या प्रमाणावर समर्थन देते.
निष्कर्ष: समाजातील महिलावर्गाचे प्रतिनिधित्व करणारी बाजारपेठ
महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योग आणि बचत गटांना भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बाजारपेठांपैकी एकामध्ये थेट प्रवेश देऊन, GeM वरील 'वुमनिया इनिशिएटिव्ह' विद्यमान उत्पादन क्षमतांचे औपचारिक, शाश्वत उद्योग सहभागात रूपांतर करते. जसजशी अधिक महिलांना ओळख मिळते, त्या क्षमता निर्माण करतात आणि सरकारी खरेदीदारांशी जोडल्या जातात, तसतसा 'वुमनिया' हा केवळ एक खरेदी उपक्रम न राहता, अधिक आर्थिक स्वातंत्र्य आणि व्यापक प्रतिनिधित्वाचा एक मार्ग बनतो, ज्यामुळे सार्वजनिक खरेदी समाजातील सुशिक्षित वर्गाच्या क्षमता आणि आकांक्षा प्रतिबिंबित करते हे सुनिश्चित होते.
PIB Research
References
MINISTRY OF COMMERCE & INDUSTRY
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2215001®=3&lang=2
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2192297®=3&lang=2
https://www.pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2106076®=3&lang=2
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1559864®=3&lang=2
https://www.pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2106076®=3&lang=2
https://www.pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1891303®=3&lang=2
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1565237®=3&lang=2#:~:text=Ceremonial%20lamp%20being%20lit%20to,Marketplace%20the%20national%20procurement%20portal.
MINISTRY OF EXTERNAL AFFAIRS
https://indbiz.gov.in/govt-e-marketplace-launches-womaniya-initiative/
MINISTRY OF RURAL DEVELOPMENT
https://www.pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=1620881®=3&lang=2
https://nrlm.gov.in/outerReportAction.do?methodName=showIndex#gsc.tab=0
SANSAD: LOK SABHA
https://www.commerce.gov.in/wp-content/uploads/2020/03/MOC_636848992668198129_LS-04-02-2019.pdf
WORLD BANK
https://documents1.worldbank.org/curated/en/099060425063724348/pdf/P177653-7547fc12-cde0-46aa-b682-8fd13b237aa2.pdf
OTHERS
https://gem.gov.in/resources/pdf/womaniya-flyer.pdf
https://mkp.gem.gov.in/search?q=womaniya
https://gem.gov.in/aboutus
https://gem.gov.in/womaniya
https://mkp.gem.gov.in/exclusive-estore-unique-seller-groups-womaniya-womaniya-handicrafts/search#/?q=womaniya
https://mkp.gem.gov.in/exclusive-estore-unique-seller-groups-womaniya-womaniya-grocery-and-pantry/search#/?q=womaniya
https://mkp.gem.gov.in/exclusive-estore-unique-seller-groups-womaniya-womaniya-office-accessories/search#/?q=womaniya
https://mkp.gem.gov.in/exclusive-estore-unique-seller-groups-womaniya-womaniya-handloom-textiles/search#/?q=womaniya
https://mkp.gem.gov.in/exclusive-estore-unique-seller-groups-womaniya-womaniya-personal-hygiene-and-care/search#/?q=womaniya
https://www.newsonair.gov.in/gem-promotes-transparency-inclusiveness-in-public-procurement-records-%E2%82%B94-lakh-crore-transactions/
https://gem.gov.in/training/training_module
https://wep.gov.in/
https://mpsrlm.mp.gov.in/uploads/files/SVEP.pdf
https://www.serp.telangana.gov.in/AboutUs/Serp_About.jsp
https://employmentnews.gov.in/newemp/MoreContentNew.aspx?n=Editorial&k=90385#:~:text=Self%2DHelp%20Groups%20or%20SHGs,carrying%20out%20social%20welfare%20programmes.
PRESS INFORMATION BUREAU
https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2025/mar/doc202532511101.pdf
https://www.pib.gov.in/factsheetdetails.aspx?id=148586®=3&lang=1
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2227484®=3&lang=1
Click here to see pdf
***
नितीन फुल्लुके/ राजश्री आगाशे/ नंदिनी मथुरे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2251076)
अभ्यागत कक्ष : 15