अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महसूल गुप्तचर संचालनालयाने ऑपरेशन दहाबू ब्लिट्झद्वारे उद्ध्वस्त केले सोने तस्करीचे जाळे

प्रविष्टि तिथि: 09 APR 2026 10:22PM by PIB Mumbai

सोन्याच्या संघटित तस्करीविरुद्ध केलेल्या एका मोठ्या कारवाईत, डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाने एका टोळीचे जाळे उद्ध्वस्त केले असून, 37.74 कोटी रुपये किमतीचे 29.37 किलो सोने जप्त केले आहे. याप्रकरणी सोन्याची वाहतूक करणाऱ्या 24 जणांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, डीआरआय अधिकार्‍यांनी नैरोबीहून येणाऱ्या सोनेवाहक महिलांच्या एका गटाची ओळख पटवली, ज्या काल मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळावरून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात होत्या.

'ऑपरेशन धहाबू ब्लिट्झ' (Operation Dhahabu Blitz) अंतर्गत 24 परदेशी नागरिकांना प्रवासादरम्यान अडवण्यात आले. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी अतिशय चपळाईने आणि योग्य समन्वय राखून केलेल्या कारवाईमुळे या प्रवाशांकडून 25.10 किलो सोन्याची बिस्किटे आणि 4.27 किलो सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. प्रशिक्षित वाहकांचा आणि कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा प्रकारच्या गुंगारा देणाऱ्या पद्धतींचा वापर करणाऱ्या एका अतिशय मोठ्या संघटित टोळीच्या कार्यपद्धतीचा उलगडा या प्रकरणातून झाला आहे.

देशाची आर्थिक आणि महसूल व्यवस्था कमकुवत करणाऱ्या आणि राष्ट्रीय हितसंबंधांना धोका निर्माण करणाऱ्या सोन्याच्या तस्करीची अशी जाळी उद्ध्वस्त करण्यासाठी डीआरआय वचनबद्ध आहे.

***

NehaKulakarni / ShileshPatil / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2250703) आगंतुक पटल : 109
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी