पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अनेक नवनवी आव्हाने असतांनाही, भारताच्या पोलाद उद्योगाने वर्ष 2025-26 मध्ये दर्शवली भक्कम वृद्धी

Posted On: 08 APR 2026 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 एप्रिल 2026

वित्तीय वर्ष 2025-26 मध्ये अनेकविध जागतिक आव्हाने, अनिश्चितता आणि दरवाढीचे संकट असतांनाही, भारताच्या पोलाद उद्योगाने अत्यंत उमदी कामगिरी करून दाखवत, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा पोलाद उत्पादक देश म्हणून आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.

वाढत्या देशांतर्गत मागणीचे पाठबळ आणि पायाभूत सुविधांचा विस्तार या बळावर, या क्षेत्राने, उत्पादन, वापर आणि निर्यात अशा सर्वच क्षेत्रात, अत्यंत लक्षणीय यश मिळवले आहे.

उत्पादन आणि मागणी दोन्हीमध्ये भक्कम वाढ:

भारताच्या कच्च्या पोलादाच्या उत्पादन वाढीचा आलेख यंदा, म्हणजेच वर्ष 2025-26 मध्येही चढलेला  राहिला आहे.  वार्षिक आधारावर, यात एप्रिल ते मार्च दरम्यान, 10.7% म्हणजेच सुमारे, 168.4 दशलक्ष टन इतकी वाढ नोंदवली गेली, यामधून , या क्षेत्राची सातत्यपूर्ण गती दिसून येते.

यात देशांतर्गत मागणीचे महत्वाचे योगदान असून, पोलादाचा वापर, यंदा देशात, 164 MnT इतका राहिला. यात, सुमारे,  7 ते 8 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. पायाभूत सुविधा, बांधकाम, रेल्वे आणि उत्पादन क्षेत्रात वाढलेल्या कामांमुळे, ही मागणी वाढली.

त्याशिवाय,वर्ष 2025–26 मधली विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, निर्यात क्षेत्रातही भारताची उत्तम मजबूत कामगिरी. शुद्ध पोलादाच्या निर्यातीत 35.9% पर्यंत वाढ होऊन, ते एप्रिल- मार्च दरम्यान, 6 दशलक्ष टनांपर्यंत (6.6 MnT) पोहोचले. तर याच काळात आयातीत लक्षणीय घट होऊन, ते 31.7% टक्क्यांपर्यंत पोहोचले.

निर्यातीत झालेल्या वाढीस, विविध नव्या बाजारपेठा मिळणे आणि भारतीय  पोलाद क्षेत्रातील सुधारलेली स्पर्धात्मकता हे ही घटक कारणीभूत ठरले.

स्थिर किमती मात्र दर तफावतीचा ताण

भारतातील पोलादाच्या किमतीमध्ये गेल्या तीन वर्षात सातत्याने घसरण होत होती, 2026 मध्ये मात्र किमती जरा सावरल्या.  असे असले तरीही, कच्च्या मालाच्या जागतिक किमतींमधले चढउतार, विशेषतः कोळसा आणि इतर वस्तूंच्या  कायम राहिल्याने, नफा मिळवणे दुरापास्तच होते. लॉजिस्टिक आणि मालवाहू खर्चात झालेली वाढ, भू-राजकीय संकटे यामुळेही विक्रीतल्या नफ्याची तफावत कमीच होती.

नव्याने आलेली आव्हाने:

सरकारने हस्तक्षेप करत,पोलादासह, महत्वाच्या क्षेत्रांच्या  एलपीजी च्या वितरणात वाढ करून, पश्चिम आशियातील संकटाची झळ कमी बसेल, याची काळजी घेत, उत्पादन कमी होणार नाही, हे सुनिश्चित केले.  

मात्र, त्याशिवाय ऊर्जेच्या वाढत्या किमती आणि पुरवठा साखळी विस्कळीत होणे, यामुळे जागतिक संकटांचे धक्के बसवण्याची शक्यता अधिकच वाढली आहे.

या सगळ्या परिस्थितीत, भारताच्या व्यापक आर्थिक वाढीला पाठबळ देण्यात, पोलाद क्षेत्राची महत्वाची भूमिका,  ठळकपणे जाणवणारी आहे.

परिप्रेक्ष्य

भविष्याकडे बघता, भारतीय पोलाद उद्योग, पुढेही आपली विकासाची गाथा कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. देशाचे पोलाद उत्पादन, अधिक वाढणार असून, मागणीही अधिक राहणार आहे. त्याशिवाय, या क्षेत्राला, ऊर्जा सुरक्षा, कच्च्या मालाचा खर्च, आणि जागतिक बाजारातील चढउतार अशा आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

धोरणात्मक पाठबळ, पायाभूत सुविधांचा आणि हरित पोलाद तंत्रज्ञानात गुंतवणुकीचा विस्तार, सातत्याने राहिल्याने, हे उद्योगक्षेत्र, भारताच्या औद्योगिक आणि वित्तीय विकासाचा महत्वाचा स्तंभ राहिले आहे.


सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2250248) अभ्यागत कक्ष : 17