केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (दोन), 2025 च्या गुणवत्ता यादीच्या क्रमवारीत सुधारणा

Posted On: 07 APR 2026 9:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2026

भारतीय लष्करी अकादमी, भारतीय नौदल अकादमी  आणि हवाई दल अकादमी  यांच्यासाठीच्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (दोन), 2025 चा अंतिम निकाल आयोगाने 30 मार्च 2026 रोजी, एका  प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केला होता. यामध्‍ये  गुणवत्तेच्या क्रमवारीनुसार 302 (190 + 85 + 27) उमेदवारांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.

संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (दोन ), 2025 मध्ये, उमेदवारांच्या क्रमवारीत अधिक अचूकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी, नियम 8 अंतर्गत गुणांचे दोन दशांश अंकांपर्यंत पूर्णांकीकरण अर्थात 'राउंडिंग ऑफ’  करण्याच्या मानकीय तत्त्वाचा अवलंब करण्याची एक नवी तरतूद अंतर्भूत आहे. या तरतुदीनुसार, शिफारस केलेल्या उमेदवारांच्या परस्पर क्रमवारीत किरकोळ बदल करून सुधारित गुणवत्ता यादीची जोड इथे दिली आहे. मात्र निकालाच्या एकूण संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

निकाल पाहण्‍यासाठी इथे क्लिक करावे. 

सुवर्णा बेडेकर /तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2249890) अभ्यागत कक्ष : 9
Read this releasein: English , हिन्दी