संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय तटरक्षक दलाकरिता वेगवान गस्ती जहाज एफपीव्ही-4 साठी कील लेयिंग आणि एफपीव्ही-7 च्या प्लेट कटिंगसाठी विशेष समारंभाचे आयोजन

Posted On: 06 APR 2026 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 एप्रिल 2026

भारतीय तटरक्षक दलासाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे 06 एप्रिल 2026 रोजी वेगवान गस्ती जहाज, एफपीव्ही -4  (यार्ड 16504) च्या पायाभरणीचा सोहळा आणि  एफपीव्ही -7 (यार्ड 16507) साठी प्लेट कटिंग कार्यक्रम 14 एफपीव्ही प्रोजेक्ट (यार्ड 16501-14)अंतर्गत  झाला.
 
या जलद गस्ती नौकांमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवली जात असून त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स सिस्टम आणि बहुउद्देशीय ड्रोन यांचा समावेश आहे. प्रत्येक एफपीव्ही मध्ये म्हैसूरस्थित मेसर्स त्रिवेणी यांनी तयार केलेले स्वदेशी बनावटीचे गिअरबॉक्स आणि मेसर्स एमजेपी इंडिया यांनी विकसित केलेले वॉटर जेट्स बसवण्यात आले आहेत.   या एफपीव्हीची रचना किनारी सुरक्षा आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या कर्तव्यांसाठी अनुकूल अशी केली आहे.

‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेशी सुसंगत अशा प्रकारे एफपीव्ही-4 चे ‘कील लेइंग’  आणि एफपीव्ही -7 चे ‘प्लेट कटिंग’ ही कामे सुरू आहेत; ज्यामुळे हिंदी महासागर क्षेत्रात भारतीय तटरक्षक दलाची उपस्थिती अधिक बळकट होईल.

निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2249508) अभ्यागत कक्ष : 16